खेळ व क्रीडा

संत रामपाल जी महाराज यांच्या सत्संगातून शास्त्रसिद्ध भक्ती आणि आध्यात्मिक प्रगतीची शिकवण

Spread the love

 

नांदेड: 18 में 2025 रोजी नांदेड जिल्ह्यात संत रामपाल जी महाराज यांच्या अनुयायांकडून जिल्हा नांदेड येथे संत रामपाल जी महाराज यांच्या सत्संगाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या सत्संगामध्ये संत रामपाल जी महाराज यांचा प्रोजेक्टरच्या माध्यमातून सत्संग करण्यात आला होता. या सत्संग मध्ये सत् साधना व सतभक्ती बद्दल संदेश दिला गेला. या सत्संगाचा मुख्य उद्देश लोकांना जीवनातील सत्य आध्यात्मिक शांती आणि शास्त्र सिद्ध भक्तीचे महत्त्व समजावून सांगणे हा होता. संत रामपाल जी महाराज यांच्या शिकवणीनुसार या सत्संगात सृष्टीच्या निर्मितीचे सत्य, जीवनाचा खरा उद्देश आणि मोक्षाचा मार्ग यावर प्रकाश टाकण्यात आला संत रामपाल जी महाराज यांनी भगवद्गीता, चार वेद पुराण, गुरुग्रंथ साहेब, बायबल आणि कुराण शरीफ यासारख्या पवित्र धर्मग्रंथांचा आधार घेऊन आध्यात्मिक प्रगतीचा सोपा आणि शास्त्रसिद्ध मार्ग दाखवला आहे. कोणत्या देवाची सत साधना केल्याने आपल्याला मोक्ष मिळेल

आणि आपण मोक्ष प्राप्त करून व अमर लोकाला अर्थात त्या सतलोकात कसे जाऊ शकतो हे सत्संगामध्ये समजावून सांगितले. याशिवाय कबीर परमेश्वर हेच सृष्टीचे खरे निर्माता असल्याचे सविस्तरपणे पटवून देण्यात आले आणि त्याच्या भक्तीचे महत्त्व उपस्थितांना समजावून सांगितले गेले या सत्संगाने उपस्थित श्रद्धाळुंवर सकारात्मक प्रभाव पाडला आणि अनेकांना जीवनात सकारात्मक बदल घडवण्याची प्रेरणा मिळाली. उपस्थितांनी संत रामपाल जी महाराज यांच्या शिकवणीवर आधारित ज्ञान ऐकून आपल्या जीवनाला नवीन दिशा मिळाल्याचे सांगितले. या सत्संगामुळे समाजात आध्यात्मिक जागरूकता निर्माण होण्यास मोठी मदत झाली आहे. संत रामपाल जी महाराज यांचे अनुयायी भविष्यातही अशा सत्संगाचे आयोजन करत राहतील ज्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडतील, आणि लोकांचे जीवन अधिक अर्थपूर्ण बनेल. या उपक्रमामुळे लोक शास्त्रसिद्ध भक्तीच्या मार्गावर चालण्यास प्रेरित होत आहेत असा संदेश श्रोत्यांनी दिला.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close