संत ज्ञानेश्वर भवनात युवक-युवती परिचय मेळावा
विदर्भातील बारी समाज मोठ्या संख्येने उपस्थित
नेर / नवनाथ दरोई
अमरावती हे शहर सातपुडा पर्वतरांगाच्या पायथ्याशी वसलेले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व कर्मयोगी गाडगेबाबा यांच्या चरण स्पर्शाने पावित्र्य झालेल्या व वर्षाच्या सरत्या शेवटी हनुमान गढी येथे संपन्न झालेल्या शिवपुराण पुण्यनगरीत बारी समाजाच्या युवक- युवती परिचय मेळावा बहुउद्देशीय संस्थेद्वारा ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अचलपूर मतदार संघाचे आमदार बंच्चू कडू हे मंचावर विराजमान होते. प्रमुख पाहुणे म्हणून राजेंद्र राऊल, अविनाश बदुकले, अरुण अकोलकर,व अन्य पाहुणे मंचावर विराजमान होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या शुभहस्ते व पाहुण्याच्या उपस्थितीत कर्मयोगी गाडगेबाबा व संत रुपलाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. आमदार बच्चू कडू यांनी बारी समाजासाठी भरभरून मदत दिल्यामुळे बारी समाजाकडून सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना आमदार बच्चू कडू असे म्हणाले की, बारी समाजातील अनेक कुटुंब पान व्यवसाय व पिंपरी यावर अवलंबून आहे असल्यामुळे त्यांना मदत मिळऊन देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. युवक-युवती परिचय मेळाव्यासाठी नागपूर, यवतमाळ,व विदर्भातून अनेक वधूवर व समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.