मोबाईल टावरच्या केबल चोरणारी टोळी गजाआड
मंगरूळ दस्तगीर पोलीसांची धडक कारवाई
१ *लाख* *१५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
मंगरूळ दस्तगिर / प्रतिनिधी
मंगरूळ दस्तगीर.अमरावती ग्रामिण जिल्हयातील विविध मोबाईल कंपन्याचे टावरच्या केबल चोरीच्या घटनात वाढ होत असल्याच्या प्राप्त तक्रारीवरून निष्पन्न झाले होते. सदर चोरीच्या घटनांना त्वरीत आळा बसण्याकरिता व घडलेल्या गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेवून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत मा. अविनाश बारगळ, पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रा. यांनी सर्व पोलीस स्टेशन, प्रभारी अधिकारी, अमरावती ग्रा. यांना आदेशित केले होते.
दि. २१/०४/२०२३ रोजी मंगरुळ दस्तगीर पथक गस्त करित असतांना गोपनिय माहीती प्राप्त झाली की,
आरोपी जगदीश शिवदास पांडे, वय २८ वर्ष, रा. अर्जनसिंगी व त्याचे इतर साथीदार हे मोबाईल टावर केबल चोरीचे गुन्हे.
करित असून सध्या ते गुन्हा करण्याचे तयारीत आहेत. प्राप्त माहीतीची शहानिशा करून पथकाने ग्राम अर्जनसिंगी बस
स्टैन्ड जवळ सापळा रचुन शिताफीने आरोपीतांना अटक केली आहे.
सदर आरोपीतांना टावर केबल चोरीच्या गुन्हयांचे अनुषंगाने विचारपुस केली असता प्रथम त्यांनी टाळाटाळ केली, परंतु पोलीस खाक्या दाखवीताच त्यांनी अमरावती ग्रामिण हद्दीतील १) पो.स्टे. मंगरूळ द -०२ २) पो.स्टे. कु-हा- ०९३) पो.स्टे. आर्वी, जि. वर्धा ०१ अश्या एकुण ०४ मोबाईल टावरच्या केबल चोरीच्या गुन्हयांची कबुली दिली आहे. आरोपीतांचे ताब्यातुन चोरीचे गुन्हयातील केबल जाळुन काढलेले काँपर किं. २५०००/- रु. आरोपीतांनी बोडां ते हसनापुर रोड दरम्यान कॅनल पाईप चे आत लपवुन ठेवलेले असल्याचे सांगीतले वरून सदरचे कॉपर व गुन्हयात वापरण्यात येणारी ०२ दुचाकी वाहन किं. अं.९०,०००/- रू. ची असा एकूण १,१५,०००/- रूचा माल जप्त करण्यात आला आहे. यातील अन्य ०१ आरोपी फरार असुन सदर आरोपीचा कसून शोध घेण्यात येत आहे. अटक आरोपी सद्यस्थिती
पो.स्टे. मंगरूळ द यांचे ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास मंगरूळ द. पोलीस करित आहे.
आरोपी नामे.(१). जगदीश शिवदास पांडे. वय २८ वर्ष.(२. )कुणाल नंदकिशोर श्रीवास वय २६ वर्षे दोन्ही राहणार अर्जनसिंगी (३) रेहान खान हसन खान. वय २४ वर्ष रा. कुऱ्हा (४) सुरज हनुमंता मेश्राम वय १८ वर्ष रा. धारवाडा (५) विधी संघर्षित बालक(६) विधी संघर्षित बालक.
सदरची कार्यवाही मा. अविनाश बारगळ, पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रामीण. शशिकांत सातव, अपर पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रा. जितेन्द्र जाधव, उप विभागीय पोलीस अधिकारी, चांदुर रेल्वे यांचे मार्गदर्शनात सुरज तेलगोटे ठाणेदार पो.स्टे. मंगरूळ द यांचे नेतृत्वातील पोलीस अमलदार अवधुत शेलोकार मोसीन शहा, निशांत शेन्डे, अमोल हीवराळे, अतुल पाटील, सुधिर मेश्राम, प्रफुल्ल माळोदे यांचे पथकाने केली.