ग्रामीण भागातील आदिवासी मुलींना मोफत वाटण्यात आले सैनिटरी नॅपकिन …
लायन्स क्लब आर्वी चा सूप्त उपक्रम…
डॉ कालिंदी राणे यांनी केले युवतीना आरोग्य विषयक मार्गदर्शन…
आर्वी / प्रतिनिधी
लायन्स क्लब आर्वी समाजिक दायित्व जपत सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असते , हे सामाजिक दायित्व जपत असताना लायन क्लब आर्वी ने आता “चलो गाव की ओर” या उपक्रमा अंतर्गत किशोरवयीन मुलींना वाढत्या वयातील शारीरिक बदल ,आरोग्य विषयक मार्गदर्शन, व मोफत सॅनिटरी पैड वाटप हा प्रकल्प हाती घेतला आहे.
हा कायमस्वरूपी उपक्रम असून या मध्ये त्यांनी कारंजा तालुका येथील नारा या छोट्या गावातील कै. यादवराव केचे आदिवासी निवासी शाळेतील ३५ आदिवासी मुलींना दत्तक घेतले आहे. या मुलींना दर महिन्याला त्यांच्या आरोग्यासाठी मार्गदर्शन करुन त्यांची आरोग्य तपासणी केले जाईल. तसेच त्यांची आरोग्यविषयक सुरक्षा लक्षात घेता त्यांना दर महिन्याला सॅनिटरी पॅड आणि इतर औषधे मोफत पुरवल्या जातील. नुकतेच लायन्स क्लब आर्वीच्या लॉ.डॉ.कालिंदी राणे( प्रशिध्द स्त्रीरोग तझ ) यांनी किशोरवयीन मुलींना नाराया गावात जाऊन आरोग्याबाबत अप्रतिम मार्गदर्शन केले, तसेच लॉ.संगीता ढबाळे यांनीही यावेळी शैक्षणिक मार्गदर्शन केले, लॉ आरती देशमुख आणि लॉ. सुनीता जाणे व इतर या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.