क्राइम

आमदाराचा अल्पवयीन मुलीवर सतत चार वर्षे लैंगिक अत्याचार

Spread the love

कर्नूल  / नवप्रहार मीडिया

               हलाकीच्या परिस्थिती मुळे आई वडीलांसोबत आमदाराच्या घरी कामावर असलेल्या अल्पवयीन मुलीचे आमदारकडून लैंगिक शोषण झाल्याची धक्कादायक बाब मुलीच्या तक्रारी नंतर समोर आली आहे. मागील चार वर्षापासून हा नराधम आमदार मुलीचे लैंगिक शोषण करीत होता. पुराव्या दाखल मुलीने व्हिडीओ पोलिसांना दिला आहे. एका अल्पवयीन मुलीवर चार वर्षांहून अधिक काळ वारंवार बलात्कार केल्याच्या आरोपाखाली आंध्र प्रदेश पोलिसांनी वायएसआर काँग्रेस पक्षाचे माजी आमदार जे सुधाकर यांना अटक केली आहे.

कोडुमुरूचे माजी आमदार सुधाकर (५०) यांना १७ वर्षीय तरुणीच्या तक्रारीनंतर गुरुवारी अटक करण्यात आली. मुलीने पोलिसांना ‘व्हिडीओ पुरावा’ही दिला आहे. आमदाराने त्याच्या घरात आईवडिलांसोबत कामगार म्हणून काम करत असलेल्या अल्पवयीन मुलीवर २०१९ ते २०२३ पर्यंत अनेकवेळा बलात्कार केला, असे पोलिस अधिकारी विजय शेखर रेड्डी यांनी सांगितले. पोलिसांनी माजी आमदाराला भारतीय न्याय संहिता (बीएनएस) च्या कलम ३७६ आणि ५०६ तसेच लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पोस्को) कायद्यांतर्गत अटक
केली आहे.

सरकार पडले अन्…
टीडीपीच्या नेतृत्वाखालील नवीन सरकार स्थापन होण्यापूर्वी, मुलीवर अत्याचार झाल्याचा व्हिडीओ समोर आला होता, मात्र तत्कालीन आमदाराविरुद्ध तक्रार करण्यासाठी कोणीही पुढे आले नव्हते. मात्र, नवीन सरकार आल्यानंतर मुलीने हिंमत दाखवत गुरुवारी आमदाराविरोधात तक्रार दाखल केली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close