क्राइम

वाळू माफियांनी वाळूचा ट्रॅक्टर अंगावर घातला. एएसआय चा मृत्यू 

Spread the love

शहडोल  ( मध्यप्रदेश ) /नवप्रहार डेस्क

                                 वाळू माफियांनी कारवाई साठी आलेल्या पोलीस वाल्याचा अंगावर ट्रॅक्टर घातल्याने एएसआय चा मृत्यू झाला आहे. या घटनेने पोलीस प्रशासनात खळबळ माजली आहे. या घटनेनंतर आरोपीच्या घरावर बुलडोजर घालून त्याचे घर पाडण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक कुमार प्रतिक यांनी सांगितले की, शनिवारी रात्री शहडोलचे सहायक पोलिस उपनिरीक्षक महेंद्र बागरी, हवालदार प्रसाद कनोजी आणि हवालदार संजय दुबे परिसरातील बेकायदेशीर वाळू वाहतूक तपासण्यासाठी घटनास्थळी गेले होते. यावेळी एका भरधाव ट्रॅक्टरला थांबविण्याचा प्रयत्न त्यांनी केला असता, ट्रॅक्टर चालकाने त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घातला. यात सहायक पोलिस उपनिरीक्षक महेंद्र बागरी यांचा जागीच मृत्यू झाला. वाहन धडकल्यानंतर पलटी झाले. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, ट्रॅक्टर चालक आणि ट्रॅक्टर मालकाच्या मुलाला अटक करण्यात आली आहे, तर ट्रॅक्टरचा मालक फरार आहे. ट्रॅक्टरचा मालक सुरेंद्र सिंग याची माहिती देणाऱ्याला ३० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

रुग्णालयाचा निष्काळजीपणा
या प्रकरणात सरकारी
रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा मोठा निष्काळजीपणा समोर आला. बागरी यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन पोस्टमॉर्टम खोलीत जमिनीवर ठेवून करण्यात आले. या प्रकरणी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

यापूर्वीही अशीच घटना : याआधी, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येही सोन नदीतून अवैध उत्खननातून वाळूची वाहतूक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलीने स्थानिक महसूल विभागाच्या अधिकाऱ्याला चिरडले होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
2
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close