आरोग्य व सौंदर्य

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य रुग्णालयाची मागणी

Spread the love

वैद्यकीय अधिकारी यांना निवेदन

अंजनगाव सुर्जी / मनोहर मुरकुटे

अंजनगाव तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते संघरतन सरदार यांनी ता वैद्यकीय अधिकारी डोंगरे यांना निवेदनात प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना चे रुग्णालय आपल्या अंजनगाव सुर्जी तालुका सोडून जवळपास महाराष्ट्र भर व अनेक ठिकाणी रुग्णालय अस्तित्वात व रुग्णांच्या मदतीत सुरू आहे. रुग्ण बरे होऊन योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ घेताना दिसत आहे. पण अंजनगाव सुर्जी तालुक्यात प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्याचे रुग्णालय नसल्याने सर्व सामान्य गोरगरीब जनतेला मोठा आर्थिक फटका सोसावा लागत आहे. खाजगी दवाखाना व हॉस्पिटलमध्ये रुग्णांसोबत पैशांची लूट होताना दिसत आहे. साधारणता टायफाईड, मलेरिया, पेशी, निमोनिया, असंख्य किरकोळ सर्दी, ताप, खोकला आजारासाठी औषध उपचार घेण्याकरिता गोरगरीब जनतेजवळ पुरेसे पैसे नसल्याने जीवितास खेळावा लागत आहे. उदार कर्ज घेऊन आजारापासून बरे होण्याकरिता कसरत करावी लागत आहे. तालुक्यात जर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्याचे रुग्णालय उपलब्ध करून दिल्यास गोरगरीब जनतेला या योजने अंतर्गत मोफत उपचारासाठी सोय होणार आहे. तरी आपण आपल्या स्तरावरून तातडीने लक्ष घालून रुग्णांच्या सोयीसाठी रुग्णालय उपलब्ध करून द्याल.अशी मागणी सरदार यांनी निवेदनातकेली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close