सना खान हिची हत्या पैश्याच्या वादातून

नागपूर / पी. संजय
भाजपा अल्पसंख्याक मोर्च्या च्या
पदाधिकारी सना खान उर्फ हिना कौसर हिची हत्या पैशाच्या वादातून झाल्याचे समोर येत आहे. पप्पू उर्फ अमित शाहू आणि सना खान हे व्यवसायात भागीदार होते. सना किळीने अमित याला काही रक्कम दिली होती. सना ने गळ्यातील चेन देखील अमित याला दिली होती. सना जबलपूर ला गेल्यावर अमित आणि सना यांच्यात वाद झाला आणि अमित ने रॉड ने तिच्या डोक्यात वार केल्याने तिचा मृत्यू झाला. त्यानंतर अमित ने तिचा मेउतदेह हिरण नदीत फेकून दिला होता.
अमित हा वाळू आणि दारू तस्कर आहे. त्याच्यात आणि सना मध्ये मैत्री काही झाली हे अद्याप समोर आले नसले तरी सना ने अमित याला व्यवसायासाठी रक्कम दिली होती. 2 ऑगस्ट रोजी सना जबलपूर ला गेली होती. तेथे पोहचल्यावर तिने आईला त्याबद्दल कल्पना दिली होती. पण दुसऱ्या दिवसापासून तिचा मोबाईल बंद येत असल्याने तिच्या आईने नागपूर पोलिसांना याबाबद्दल कळविले होते.
सना जबलपूर ला पोहचल्यावर मुलीत आणि तिच्यात पैश्या वरून वाद झाला. आणि सना ही जोरजोरात ओरडत असल्याने त्याने तिच्या द9क्यात रॉड घातला त्यात तिचा मृत्यू झाला. यानंतर अमित ने सहकारऱ्याच्या मदतीने तिचा मृतदेह हिरण नदीत फेकून दिला. ईतर प्रकरणाप्रमाणे हे प्रकरण देखील काही दिवसात शांत होईल असे त्याला वाटले होते. त्यामुळे तो मोबाईल बंद करून स्वतःच्या वाहनात फिरत होता. पोलीस विभागातील त्याचे हेर त्याला नागपूर पोलिसांच्या प्रत्येक हालचाली बद्दल माहिती पुरवत होते.
अमित आणि त्याचा नोकर राजेश याला पोलिसांनी अटक करुन नागपूर येथे आणले आहे. अमित आणि राजेह यांच्याशी वेगवेगळी विचारणा होत आहे. पोलीस तपासात आणखी काही सत्य बाहेर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.




