विदेश

समुद्राच्या लाटांशी खेळणे जोडप्याला चांगलेच महागात पडले 

Spread the love
सोची ( रशिया ) / नवप्रहार इंटरनॅशनल डेस्क 
            हवा , आग आणि पाणी या तिन्ही गोष्टींच्या समोर जिद्द करू नये असे जुने लोक नेहमीच सांगत असतात. पण उमेदीच्या काळात असलेली तरुण मंडळी त्यांच्या या बोलण्याकडे दुर्लक्ष करते आणि मग काही गोष्टी अंगावर घेऊन बसते. समुद्राच्या लाटांशी खेळणे आणि त्याला हलक्यात घेणे एका जोडप्याच्या चांगलेच अंगलट आले आहे. यातील महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे.
             स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहिती नुसार सोची येथील समुद्र काठी एक जोडपे हातात हात घेऊन फिरत असतात. आणि समुद्राच्या लाटेचा आनंद घेत असतात. काही काळ ते एकमेकांचा हात धरून लाटेत ओले होण्याचा आनंद लुटत असतात. पण अचानक आलेल्या एका मोठ्या लाटेत त्यांच्या हात एकमेकांच्या हातातून सुटतो. आणि महिला लाटेसोबत समुद्रात वाहत जाते. तरुण तिला वाचविण्याचा प्रयत्न करतो पण तो त्यात अपयशी ठरतो.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close