ब्रेकिंग न्यूज

समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच

Spread the love
चॅनल  नं.91 वर स्विफ्ट कारचा अपघात 
एकाचा मृत्यू तर पाच जखमी , जखमीत दोन लहान मुलांचा समावेश 
धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी 
            समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका काही केल्या थांबत नसतांना दिसत आहे. या महामार्गावरील चॅनल नं 91 वर स्विफ्ट कार च्या झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर पाच लोकं जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमींना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
              उपलब्ध माहिती नुसार अकोला येथील गोरे कुटुंब आपल्या स्विफ्ट डिझायर कार क्र. एम एच 30 /  ए एस 7742  ने अकोला वरून नागपूर कडे जाण्यासाठी निघाले होते. निंबोरा (ता.धामणगाव रेल्वे) जवळील चॅनल क्र.91 जवळ कार पलटी झाल्यानें त्यातील एक व्यक्ती दगावला आहे. तर इतर पाच लोक गंभीर जखमी झाले आहेत. जगन्नाथ गोरे असे मृत व्यक्ती हे नाव आहे. तर जखमी मध्ये प्रशांत गोरे (48) , प्रेमीला गोरे (70) , स्वाती गोरे (38) , शिवाग गोरे (68) आणि दोहा गोरे (5) यांचा समावेश आहे.
स्वाती गोरे चालवीत होत्या कार – सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार स्वीफ्ट कार स्वाती गोरे चालवत होत्या.
नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज – स्वाती गोरे या कार चालवीत असल्याने वेगावर नियंत्रण नसावे आणि अतिशय वेगात असलेले वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close