क्राइम

समोरून गोळ्या झाडून केले ठार ; युपी ची घटना

Spread the love
शाहजहाँपुर /  नवप्रहार मीडिया नेटवर्क 

              एकीकडे यूपीत योगी सरकार असल्याने कायदा आणि सुव्यवस्था असल्याचा गाजावाजा करण्यात येत आहे. तर या राज्यात बलात्कार, लव्हजिहाद, खून- मारामारी अश्या प्रकारच्या घटना घडतच असतात. नुकत्याच घडलेल्या एका घटनेने योगी सरकारच्या कार्यपद्धतीची पोलखोल झाली आहे. आपल्या मुलीला खांद्यावर घेऊन जाणाऱ्या एका व्यक्तीवर समोरून गोळीबार करून त्याची हत्या करण्यात आली आहे. .

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. सोमवारी संध्याकाळी उशीरा ही घटना घडली.

ही घटना उत्तर प्रदेशमधल्या  शाहजहांपूरमध्ये घडली. गोळ्या झाडल्यानंतर आरोपी दुचाकीवरुन फरार झाले. हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शाहजहांपूरमधल्या बाबूजी परिसरात मोहम्मद शोएब हा तरुण आपली लहान लेकीला खांद्यावर घेऊन बाजारात जात होता. याचवेळी दोन तरुण दुचाकीवरुन त्याच्या पुढे काही अंतरावर थांबले. तर समोर येणाऱ्या एका तरुणाने मोहम्मद शोएबवर अगदी जवळून गोळी झाडली. गोळी झाडल्यानंतर आरोपी दुचाकीवर बसून फरार झाला.

तर गोळी लागल्यानंतर मोहम्मद शोएब हा लेकीसह जागेवरच कोसळला. त्यानंतर मागून एक महिला किंचाळत शोएबच्या दिशेने धावत जात असताना व्हिडिओत दिसत आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहम्मद शोएबचे लग्नावरुन एका कुटुंबाशी वाद सुरु होता. त्यानंतर त्याने दिल्लीतल्या दुसऱ्या एका मुलीशी लग्न केलं. शोएबचं सुरुवातीला लग्न ठरलं होतं. पण काही कारणास्तव त्यांच्यात वाद झाले होते. जखमी मोहम्मद शोएबला मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्याची प्रकृती गंभीर आहे. दुसरीकडे पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं असून तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.

 

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close