स्वच्छता मोहीम अंतर्गत समता मैदानावर कार्यक्रम संपन्न

यवतमाळ अरविंद वानखेडे
संपूर्ण भारतभर सुरू असलेल्या महात्मा गांधी यांच्या जयंती दिनानिमित्त स्वच्छता अभियान राबवण्याची सुरुवात आज दिनांक एक ऑक्टोंबर पासून सुरू झालेली असून त्या पार्श्वभूमीवर, यवतमाळ येथील समता मैदानावर आयोजित समारंभात यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पंकज आशिया साहेब तसेच यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावनाताई गवळी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
जिल्हाधिकारी यांनी स्वच्छतेबाबत माहिती देऊन प्रत्येक व्यक्तीने आज तारीख एक पासून एक तारीख एक तास स्वच्छता मोहीम राबवून, शासनाच्या हा संकल्प प्रत्येक व्यक्तीने राबवून परिसर स्वच्छ ठेवावा असे आव्हान त्यांनी केले. त्याचप्रमाणे खासदार भावनाताई गवळी यांनी सुद्धा स्वच्छता मोहीम कशा पद्धतीची राबवून आपलं गाव आपलं शहर, आपला जिल्हा, कशा पद्धतीने स्वच्छ ठेवावा यावर मार्गदर्शन केले. यावेळी प्रामुख्याने ज्योतिबा फुले कॉलेज ऑफ सोशल वर्क, त्या विद्यार्थ्यांची प्रमुख उपस्थिती होती. नगरपरिषदेतील स्वच्छता कामगार, यांना सुद्धा शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. नगरपरिषदेतील सर्व कर्मचारी यांनी या स्वच्छते मोहिमेमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष राजूभाऊ डांगे, देशमुख साहेब, सुरेश कन्नाके पडगिलवार भाऊ इत्यादी मान्यवर उपस्थित होते. संचालन श्री सुनील भाऊ वासनिक यांनी केले, नगरपरिषद चे मुख्याधिकारी डोलारकर साहेब, यांनी सर्व उपस्थित त्यांना या मोहिमेत सहभागी होऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले.