कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संविधान दिन व २६/११ च्या दहशतवादी हल्यात शाहिद जवानांना व नागरिकांना नमन
दर्यापूर / सूरज देशमुख
भारतीय संविधान केवळ एक कागदी दस्ताऐवज नसून भारतीय माणसांच्या मुलभूत-आनंदी जीवन व्यतीत करण्याचा देशधर्म ग्रंथ आहे! आज भारतीय संविधान दिवस. त्यानिमित्त कृषी उत्पन्न बाजार समिती दर्यापूर यांच्या वतीने समस्त भारतीयांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत, समाजातील प्रत्येक घटकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार देणारे भारतीय संविधान देशाची एकात्मता व अखंडता अबादीत ठेऊ यात असा संकल्प यावेळी करण्यात आला व २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद जवान व पोलिसांनी मोठ्या शौर्याने लढा देत अतिरेक्यांना थोपवून लावलं; त्या विरांचे स्मरण करत. सर्व शहीद पोलीस, जवान बांधव व निष्पाप नागरिकांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली. यासोबतच संविधान दिनाचे औचित्य साधत समाजसेवक अवधुतराव दौलतराव कुऱ्हाड़े यांनी स्वरचित गीत सादर करत कार्यक्रमाची शोभा वाढवली यावेळी त्यांच्या गीताचे उपस्थितांनी कौतुक केले यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकळे , कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनिल पाटील गावंडे , उपसभापती राजू पाटील कराळे, संचालक गजाननराव देवतळे , संचालक राजेद्र पाटील वढाळ , संचालक साहेबराव भाऊ भदे , संचालक भारत भाऊ आठवले, राजेश शेठ राठी, संचालक प्रभाकर पाटील तराळ , संचालक असिफ भाई, अवधुतराव कुऱ्हाड़े, दत्ता भाऊ कुंभारकर, बाजार समितीचे सचिव हिम्मतराव मातकर , व सर्व कर्मचारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.