संत गाडगेबाबा यांच्या संगमरवरी मुर्तीची प्राणप्रतिष्ठा व जन्मोत्सव हर्षोल्लासात साजरा
मुर्तिजापूर ( ) संत गाडगेबाबा नगर , कोकणवाडी येथे संतक्षेष्ठ गाडगेबाबा यांच्या स्मारक मंदिराचा जिर्णोद्धार , प्राणप्रतिष्ठा तसेच गेल्या 41 वर्षापासुन साजरा होणारा जन्मोत्सव तिन दिवसांपासून विधिवत पुजा – अर्चा आणि भजन किर्तनासह महाआरती आणि महाप्रसादाने हर्षोल्लासात साजरा करण्यात आला.
निष्काम कर्मयोगी , वैराग्यमुर्ती संतक्षेष्ठ गाडगेबाबा यांच्या जयपूर येथून आणलेल्या संगमरवरी मुर्तीची दि. 7 मार्च ला शहरातील वृदंवन नगर येथून शिवाजी चौक , भगतशिंग चौक मार्गे गाडगेबाबा नगर अशी शोभायात्रा दिंड्या डिजेच्या व संत गाडगेबाबा यांच्या गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला च्या गजराने संत गाडगेबाबा यांच्या स्मारक पर्यंत नागरीकांनाचा अथक उत्साह ठिकला . तर दि.8 मार्च शुक्रवार रोजी संत गाडगेबाबांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली
महाशिवरात्री ला संत गाडगेबाबा यांचा जन्म झाला असल्याने मुर्तिजापूर येथिल कोकणवाडी स्थित संत गाडगेबाबा स्मारक मदीरात गेल्या 41 वर्षापासुन अखंड जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येतो .
संत गाडगेबाबांच्या स्मारकाच्या जिर्णोद्धार लोकार्पण सोहळा दि. 9 मार्च ला सकाळी 10:30 वाजता संपन्न होऊन महाआरती आणि दुपारी महाप्रसादास काल्याच्या प्रदाने सुरुवात झाली .
विद्यमान आमदार , माजी नगराध्यक्ष , माजी नगरसेवक , अनेक सामाजिक कार्यकर्ते स्वयंस्फूर्त समाजसेवक आदींसह शहरातील प्रतिष्ठीत नागरीक , महिलासह संत गाडगेबाबा विचार प्रेमी आणि संत गाडगेबाबा स्मारक समितीच्या अध्यक्षांसह पदाधिकारी सदस्यांबरोबरच धोबी समाज बाधव मोठ्या संख्येने उपस्थित होता .