ब्रम्हलीण संत मारोती महाराज मुर्तीची प्राणप्रतिष्ठा व मंदीर कळस स्थापणा कामठवाडा येथे उत्साहात संपन्न

घाटंजी तालुका प्रतिनीधी / सचिन कर्णेवार
ब्रम्हलिण व घाटंजी पंच्यकोषीत प्रसिध्द असलेले संत मारोती महाराज यांचे नुक्तेच कामठवाडा येथे भव्य मंदिर ग्राम व लोक सहभागातुन उभारण्यात आले. कामठवाडा येथे शिव झालेले संत मारोती महाराज यांचा जन्म तामसा नदिच्या तीरावर पिंपळगाव येथे झाला. आधिपासुनच देवधार्मीक वृत्तीचे मारोती महाराज देवदेव करत तल्लीण आपल्याच धुंदीत असत.मुगसाजी माऊली देव धामणगाव यांचे मारोती महाराज परम शिष्य कामठवाडा येथे महल्ले पाटील कडे प्रथम आले. जे महाराज बोलतील ते खर होत गेल्याणी त्यांचा बराच भक्तवर्ग निर्माण झाला. कामठवाडा वरुन काही काळ महाराज घाटंजीतही होते त्यांची सत्यता व शब्दांची खरीपणा प्रचिती घाटंजी करांणाही आला त्यामुळे घाटंजीतही त्यांचा खुपमोठा भग्तांचा गोतावळा निर्माण झाला. त्यांचे नावे आजही घाटंजी यात्रा भरते. अशा थोर संत मारोती महारांजेचे मंदीर व मुर्ती प्राण प्रतीष्ठा मोठ्या थाटात भक्तीभावाणे मिरवणुक, भजन किर्तंण, ढोल ताशाचे गजरात कामठवाडा गावात करण्यात आली.या प्रसंगी बाल ब्रम्हचारी कळीराम महाराज सावळी. स्मामी भास्करानंद सरस्वती कोल्हापुर तसेच मारोती महाराज वंशज वसंत नानीजी चिवरकर व मारोती महाराज शिष्य परम पुज्य पराये गुरूजी यांचे चिरंजिव अतुल पराये यांची उपस्थिती होती.