भ्रष्ट्राचार

साहित्य पुरवण्याआधीच कंत्राटदाराचे देयक मंजुर

Spread the love

 

भाजपच्या माजी उपाध्यक्षांची तक्रार

प्रतिनिधी/ दिनेश मुळे

शेंदुरजनाघाट नगरपरिषदेकडुन शाळेचे डेस्क, बेंच बनविण्याचा कंत्राट एका कंत्राटदारास देण्यात आला. परंतु तब्बल दोन वर्षाच्या विलंबानंतर त्याने पुरविलेल्या फर्निचरमध्ये बिघाड असल्यामुळे नगरपरिषद प्रशासनाने ते स्वीकारले नाही. त्यामुळे हे साहित्य गेल्या अनेक दिवसापासून शहरातीलच एका
गोदामात पडून आहे. परंतु या साहित्याचे देयक मात्र कंत्राटदाराला पूर्वीच देण्यात आले आहे. हे गौडबंगाल शेंदूरजना घाट नगर परिषदेत घडल्याचे उघडकीस आल्यानंतर माजी नगर उपाध्यक्ष व भाजपाचे माजी मोर्शी संपर्क प्रमुख विशाल सावरकर यांनी खा. बोंडे व जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे.
शेंदूरजनाघाट नगर परिषदेला वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान योजनेंतर्गत सन २०१९ मध्ये ५ कोटी मंजूर रक्कमेत एकूण १४ विकास कामे करण्याची नियोजन केले होते.यामध्ये नगर परिषद शेंदूरजनाघाट येथील सर्व नगर परिषद शाळांची दुरुस्ती, सुधारणा, साहित्य सुविधा पुरविणे हे काम समाविष्ट करून त्या कामाची अंदाजित किमंत ३८ लक्ष ९२ हजार ८६५ रूपये एवढ्या रकमेचे ई निविदा नोटीस क्रमांक ३५६|२१ दि.२६|०२|२०२१ नुसार प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार सदर कामाचे कंत्राट दि.२३|०४|२०२१ रोजी संबंधित कंत्राटदाराला देण्यात आला होता. परंतु सदर काम पूर्ण करण्याचा कालावधी न.प. आदेशाप्रमाने ३ महिण्याचा होता.सदर कामाचा कालावधी पूर्ण होऊन दोन वर्ष झालेले असून सुद्धा अद्यापर्यंत नगर परिषदेला डेस्क बेंच पुरवठा करण्यात आलेला नाही. परंतु संबंधित कंत्राटदाराने नगर परिषद प्रशासनाला कोणत्याच प्रकारची सूचना न देता न.प.अखत्यारीत असलेल्या कम्युनिटी हॉल येथे दोन महिण्याआधी सदर डेस्क बेंचेस आणून ठेवले परंतु डेस्क बेंचेस हे अंत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे नगर परिषदेने हस्तांतरित केलेले नाही. नगर परिषदेने संबंधित कंत्राटदाराला डेस्क बेंचेस पुरवठा होण्याच्या आधीच ३०० डेस्क बेंचेस चे दि.०४|११|२०२२ रोजी १८ लक्ष १८ हजार १९० रूपये एवढी रक्कम तर २५० डेस्क बेंच चे दि.१५|०५|२०२३ ला १५ लक्ष १५ हजार १५९ रूपये एवढी रक्कम अदा करण्यात आलेली आहे. नगर परिषद शेंदूरजनाघाट येथे प्रशासक कार्यरत आहेत. सदर कामांमध्ये नगर परिषदेला कोणत्याच प्रकारचे डेस्क बेंचेस चा पुरवठा न करता दिपक बोंदरे या कंत्राटदाराला एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम प्रशासक तथा मुख्याधिकारी रविंद्र पाटील यांनी वैयक्तिक लाभाकरिता अदा करण्यात आल्याचे दिसून येते. त्यामधून प्रशासनाचा उघड भ्रष्टाचार दिसून येत आहे. करिता नगर परिषद शेंदूरजनाघाट येथे डेस्क बेंच पुरवठा मध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या प्रशासक रविंद्र पाटील यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी व दिपक बोंदरे या कंत्राटदाराकडून रक्कम वसूल करून या कंत्राटदाराला काळ्या यादीमध्ये टाकण्यात यावे असे निवेदन नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टीचे माजी मोर्शी संपर्क प्रमुख विशाल सावरकर यांनी खा.बोंडे व जिल्हाधिकारी यांच्या कडे केली आहे.

प्रक्रीया नियमानुसारच झाली

मध्यंतरी कोविड या साथीच्या आजाराने जगभरात थैमान घातले असल्याने डेस्क बेंचेस सुद्धा उशिरा बनवण्यात आले होते. परंतु डेस्क बेंचेस पुर्णताह तयार झाल्यानंतर नगरपरिषदेला हस्तातंरीत करण्यात आले. हस्तातंरीत झाल्यानंतरच नगरपरिषदेकडुन देयक स्विकारण्यात आले.
संबधीत कंत्राटदार
दिपक बोंदरे

 

डेस्क बेंच च्या कामात तफावत

संबधीत कामासंदर्भात असे झाले की त्यांना जेव्हा काम देण्यात आले त्यांनतरचा काळ कोविड चा असल्यामुळे त्यांनी डेस्क बेंचेस नगरपरिषदेला उशिरा हस्तातंरीत
केले परंतु डेस्क बेंचेस च्या कामात थोडी तफावत दिसुन आल्याने त्याचे रिपेरिंगचे काम कंत्राटदाराकडुन करण्यात येत आहे.

शे.घाट नगरपरिषद प्रशासक
तथा मुख्याधिकारी
रविंद्र पाटिल

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close