हटके

प्रेमविवाहाचा दुःखद अंत, पत्नीने पतीला संपवले

Spread the love

प्रतिनिधी /  सोलापूर

                गेल्या काही काळापासून राज्यातील क्राईम ग्राफ वाढला आहे. गँगवार, लूटमार, चोऱ्या ,बलात्कार अश्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. सोबतच कौटुंबिक वाद अगदी टोकाला जात असल्याचे पाहायला मिळत आहे. कुटुंबातील संवाद हरपल्यामुळे आणि विभक्त कुटुंब पद्धतीमुळे असे घडत असल्याचे देखील बोलल्या जात आहे. अशीच घटना दक्षिण सोलापूर मध्ये घडली आहे. पंधरा वर्षांपूर्वीच्या प्रेमविवाहाचा दुःखद अंत झाला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, प्रेमविवाह केलेल्या पती-पत्नींमध्ये झालेल्या किरकोळ वादातून पत्नीने पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना दक्षिण सोलापूर भागात घडली. धुळाप्पा नंदकुमार हेले असे मृत पतीचे नाव असून प्रगती हेले असे हत्या केलेल्या पत्नीचे नाव आहे. दक्षिण सोलापूरमधील तांदुळवाडी येथे ही भयंकर घटना घडली.

धुळाप्पा आणि प्रगती यांचा 15 वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता, त्यांना एक 13 वर्षाची मुलगीही आहे. मृत धुळाप्पा हेले हे ट्रान्सपोर्टमध्ये चालक म्हणून काम करत होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वारंवार खटके उडत होते. गुरुवारी (ता. 5 डिसेंबर) पती पत्नीमध्ये असाच टोकाचा वाद झाला. याच वादातून दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पत्नी प्रगतीने पतीच्या डोक्यात लाडकी दांडग्याने वार करुन त्याचा निर्घृण खून केला.

धक्कादायक बाब म्हणजे हत्येनंतर पत्नीने स्वतःच पोलिसांना याबाबतची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. तसेच पत्नी प्रगती हेलेलाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या हत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस अधिक तपास करत आहेत. प्रेमविवाहाचा हा भयंकर शेवट पाहून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close