क्राइम
सचिन याचे मृतक हिमानी वर धक्कादायक आरोप , घरी बोलावलं शरीर सबंध ठेवले अन्….

नवी दिल्ली / नवप्रहार ब्युरो
हरियाणा येथील काँग्रेस ची महिला पुढारी हिमानी नरवाल हिच्या हत्ये प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपी सचिन याने तिच्या बद्दल धक्कादायक विधान केले आहे. त्याच्या मते त्या दोघात प्रेमसंबंध होते. हिमानी ने त्याला घरी बोलवून त्याच्या सोबत शारीरिक संबंध ठेवत त्याचा व्हिडिओ बनवला होता. आणि त्याद्वारे ती त्याला ब्लॅकमेल करत होती.
हरियाणातील काँग्रेसची युवा महिला नेता हिमानी नरवाल हिच्या हत्या प्रकरणी एकाला अटक करण्यात आलीय. हिमानीचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून फेकून देण्यात आला होता. अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव सचिन असं असून हिमानी आणि आरोपी यांच्यात प्रेमसंबंध होते अशी माहिती समोर येत आहे. आरोपी हरियाणातील बहादुरगढचा असून पोलीस चौकशीत त्याने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.
आरोपीने हिमानीची हत्या घरीच केल्याचं कबूल केलंय. हत्येनंतर मृतदेह सुटकेसमध्ये भरून घेऊन गेला होता. दोघे बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये होते. आपण हिमानीचा बॉयफ्रेंड असल्याचाही दावा आरोपी सचिनने केलाय. हिमानीकडून मला ब्लॅकमेल केलं जात होतं. हिमानीला लाखो रुपये दिले होते. तरीही हिमानी पुन्हा पुन्हा पैशांची मागणी करत होती असा आरोप सचिनने केलाय.
इतकंच नाही तर आरोपीने गंभीर असे आरोप हिमानीवर केले आहेत. हिमानीने शारीरिक संबंध ठेवल्यानंतर व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेल केल्याचंही त्याने म्हटलंय. हिमानी आणि आरोपी यांच्यात एक वर्षापूर्वी सोशल मीडियावरून ओळख झाली होती. हिमानीने सचिनला घरी बोलावलं होतं. दोघांनी शरीरसंबंध ठेवले पण हिमानीने त्याचा व्हिडीओ शूट केला. हा व्हिडीओ दाखवूनच ती ब्लॅकमेल करत होती असा दावा सचिनने केलाय. त्याच्याकडून लाखो रुपये उकळल्यानंतरही आणखी पैशाची मागणी करत होती म्हणून तिची हत्या केली असं सचिनने पोलिसांना सांगितलं.
बहादुरगढचा सचिन हा मोबाइल एक्सेसिरीजचं दुकान चालवतो. सचिन विवाहित असून त्याला दोन अपत्येही आहेत. वर्षभरापूर्वी त्याची हिमानीशी ओळख झाली होती. त्यानंतर हिमानीने त्याला घरी बोलावलं होतं. हिमानीने दोघांमधील संबंधाचे व्हिडीओ शूट करून ब्लॅकमेल केलं.