Uncategorized

मृत्यूशी अखेर झुंज संपली अपघातात डोक्याला जबर मार लागल्याने रुपेश चिखराम नागपूर येथे उपचारादरम्यान अखेर मृत्यु

Spread the love

 

घाटजी तालुका प्रतिनिधी-सचिन कर्णेवार

घाटंजी तालुक्यातील मांडवा गटग्रामपंचायतमध्ये येत असलेल्या येवती येथील तरुण रुपेश महादेव चिखराम वय 32वर्ष यांचा दि.10 मार्च 2024 रोज रविवारला यवतमाळ ते घाटंजी रोडवर आकपुरी जवळ यवतमाळ वरून घाटंजीकडे आपल्या मोटर सायकलने जात असतांना एका भरधाव वेगाने जाणाऱ्या हुंदाई एम एच 40AR 4003या वाहणाने जबर धडक दिल्याने गंभीर जखमी झाला होता त्याला प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय घाटंजी येथे नेण्यात आले आणि घाटंजी येथून रुग्णवाईकाने यवतमाळ येथील खाजगी हॉस्पिटल क्रिटिकेअर येथे दाखल करून उपचार सुरु केले तेथील उपचारादरम्यान रुपेशच्या डोक्याला आणि छातीला जबर मार असल्याचे निदान डॉक्टरांनी सांगितले दरम्यान उपचार सुरु असतांना रुपेशची तब्बेतीत सुधारणार होत नसल्याने त्याला नागपूर येथे हळविण्यात आले परंतु नागपूर येथे उपचार सुरु असतांना रुपेशची मागील तीन दिवसापासून मृत्यूशी चाललेली झुंज अखेर संपली आणि दि.12 मार्च 2024ला सायंकाळी तिथेच त्याची प्राणज्योत मावळली.त्याच्या मृत्यूची बातमी येवती या गावी मिळताच सर्वत्र शोककळा पसरली आणि घाटंजी परिसरात हाहाकार माजला त्याच्या जाण्याने कुटुंबावर मोठा आघात झाला असून त्याच्या मागे आई,वडील पाच भाऊ, पत्नी आणि त्याला एक दीड वर्षाचा मुलगा असा मोठा आप्त परिवार आहे त्याच नेमक 2020 मध्येच लग्न झालं होत.

भरधाव वेगाने आणि बेजबाबदारपणे चालवत जाणाऱ्या वाहन चालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्याला अटक करावी आणि मृतक श्री रुपेश चिकराम यांच्या परिवाराला न्याय देण्याची मागणी परिसरातील नागरिक आणि समाजबांधव करीत आहे.

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

Pande Sanjay

Related Articles

Back to top button
Close
Close