राजकिय

रूपाली ठोंबरे यांचा  चाकणकर यांचेवर खळबळजनक आरोप 

Spread the love

वाचा काय केला आरोप

नाशिक / विशेष प्रतिनिधी 

         लिंगपिसाट स्वयंभू कॅप्टन अशोक खरात याचे प्रकरण जसजसे पुढे जात आहे. तसतसे एकामागून एक भयंकर खुलासे होत आहे.  १०० पेक्षा जास्त महिलांना आपल्या विकृत मानसिकतेचा शिकार बनविणाऱ्या अशोक खरात चा कारनामा उघड होताच राज्यात भूकंप आला आहे. राजकीय क्षेत्र तर ढवळून निघाले आहे. एकीकडे या प्रकरणात रूपाली चाकणकर यांनी महिला आयोगाचा राजीनामा दिला आहे. आता त्या पक्षाच्या महिला अध्यक्षांचा देखील राजीनामा देण्याच्या तयारीत आहे. तर दुसरीकडे रूपाली ठोंबरे यांनी चाकणकर या अशोक खरात यांच्या एजंट होत्या असे विधान करून नवीन वादाला तोंड दिले आहे.

राज्यात गाजत असलेल्या अशोक खरात प्रकरणात आता एक अत्यंत स्फोटक वळण आले आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर या आयोगाच्या अध्यक्ष म्हणून नाही, तर भोंदू अशोक खरातच्या ‘एजंट’ म्हणून काम करत होत्या, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली ठोंबरे यांनी केला आहे. या आरोपामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, चाकणकर यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

रुपाली चाकणकर काय सल्ला देत होत्या?

रूपाली ठोंबरे यांनी केलेल्या दाव्यानुसार, ज्या पीडित महिला कौटुंबिक हिंसाचार किंवा घरगुती वादाच्या तक्रारी घेऊन महिला आयोगाकडे न्याय मागण्यासाठी येत होत्या, त्यांचे योग्य समुपदेशन करणे आयोगाचे कर्तव्य होते. मात्र, रूपाली चाकणकर या महिलांना दिलासा देण्याऐवजी तुम्ही अशोक खरात बाबाकडे जा, तुमचे प्रश्न सुटतील, असा अजब सल्ला देत होत्या. न्यायाच्या आशेने आलेल्या महिलांना जाणीवपूर्वक भोंदू बाबाच्या जाळ्यात ढकलण्याचे पाप आयोगाच्या खुर्चीवर बसून झाले आहे, असे गंभीर आरोप ठोंबरे यांनी केले आहे.

रुपाली चाकणकरांना सहआरोपी करा, रुपाली ठोंबरेंची मागणी

अशोक खरातने शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे. जर यातील काही महिलांना आयोगाकडून तिकडे पाठवण्यात आले असेल, तर ही बाब अत्यंत गंभीर आहे. रूपाली चाकणकर या खरातच्या काळ्या कृत्यांमध्ये सामील आहेत का? याची सखोल चौकशी व्हावी आणि त्यांना या प्रकरणात सहआरोपी करण्यात यावे, अशी मागणी ठोंबरे यांनी लावून धरली आहे.

कॅप्टन खरात प्रकरणाला नवे वळण

याआधीही रूपाली चाकणकर यांचे खरातशी असलेले संबंध आणि एका ट्रस्टवरील त्यांचे सदस्यत्व चर्चेत आले होते. मात्र, आता थेट आयोगाकडे येणाऱ्या पीडितांना बाबाकडे पाठवण्याचा आरोप झाल्याने या प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे. या आरोपांवर आता स्वतः चाकणकर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close