खेळ व क्रीडा

रन घेतांना खेळाडू खेळपट्टीवर कोसळला ; हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

Spread the love

नवी दिल्ली / नवप्रहार मीडिया

देशाची राजधानी दिल्लीतून क्रीडा विश्वाला हादरवणारी बातमी समोर येत आहे. येथे क्रिकेट खेळत असताना धाव घेण्यासाठी धावणारा खेळाडू खेळपट्टीवर कोसळून त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेने क्रीडा विश्वात खळबळ माजली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल होत आहे.

क्रिकेट खेळताना मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव विकास नेगी असं आहे. विकास 34 वर्षांचा होता. शनिवारी नोएडाच्या सेक्टर 135 मधील स्टेडिअममध्ये क्रिकेट खेळताना विकासला अचानक हृदय विकाराचा झटका आला आणि तो जमिनीवर कोसळला. आजूबाजूला असलेल्या खेळाडूंनी त्याला सीपीआर दिला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केलं. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

Maverick-11 आणि Blazing Bulls क्रिकेट संघांमध्ये सामना सुरु असताना हा अपघात घडला. विकास हा मूळचा उत्तराखंडचा होता. तो सध्या दिल्लीतील रोहिणी येथे राहत होता. तो नोएडा येथील एका कंपनीत इंजिनिअर होता.

@HitmanCricket नावाच्या अकाऊंटवर हा घटनेचा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. 36 सेकंदांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडवत आहे. व्हिडीओवर भरपूर कमेंटही येत असून अनेकांनी या घटनेविषयी दुःख व्यक्त केलंय.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close