मागणी

निराधार योजने मधील अपंगांचे मानधन दरमहा 5000 रू करा

Spread the love

 

अपंग जनता दल सामजिक संघटना करणार मुंबई मंत्रालयाला घेराव

अमरावती — अपंगांचा जलद गतीने विकास व्हावा म्हणून केंद्र व राज्य शासनाने अनेक योजना व सवलती सुरु केल्या आहेत. परंतु प्रशासनाच्या बोगस कारभारामुळे अपंग या महत्वाच्या योजना व सवलतींपासून वंचित राहत आहेत. या संदर्भात अनेक वेळा आंदोलने, उपोषणे, पत्र व्यवहार करून सुध्दा शासन व प्रशासन जागा होत नसल्यामुळे अपंगांना रस्तावर उतरण्याची वेळ शासनाने अपंगांवर आणली आहे. अनेक राज्यांमध्ये अपंग निराधार योजनेचे मानधान महाराष्ट्र राज्यापेक्षा जास्त आहे. परंतु महाराष्ट्र राज्यात प्रगतीशिल राज्य असून सुध्दा व सर्वांत जास्त केंद्र सरकार ला महसुल देणारे राज्य आहे. परंतु अपंगांचे निराधार योजनेत मानधन वाढ करण्याबाबत दुर्लक्ष करीत आहे. नजिकच्या आंध्रप्रदेश राज्याने निराधार योजनेतील अपंगांचे मानधान दरमहा ६०००/- रुपये केले आहे.
अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या वतीने दिनांक १४/०३/२०२४ रोजी मुंबई मंत्रालयावर सामुहिक आत्मदहन आंदोलनाचा इशारा दिला होता, त्या इशाऱ्याची दखल घेत राज्य शासनाकडून लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर मानधनात वाढ करण्यात येईल असे संदर्भिय लेखी पत्र क्र. विसओ- २०२४/प्र.क्र.१४/विसयो आंदोलनादरम्यान चर्चा करून देण्यात आले होते. परंतु अजुन पर्यंत अपंगांच्या मानधन वाढी संदर्भात कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे आता राज्यातील अपंग हे रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे.
तरी निराधार योजनेचे अपंगांचे मानधन दरमहा ५०००/- रुपये करण्यासाठी मुंबई मंत्रालयाबर अपंगाचे घेराव आंदोलन बुधवार दिनांक १०/०७/२०२४ रोजी करण्यात येईल तरी राज्यातील सर्व आपंगानी आंदोलनामध्ये सहभागी व्हावे ,अशी माहिती अपंग जनता दल सामजिक संघटना अमरावती जिल्हाध्यक्ष मयूर मेश्राम यांनी दिली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close