सामाजिक

रोटरी क्लब ऑफ काॅटन सिटी आर्वी चे पदग्रहण समारंभ संपन्न

Spread the love

 


आर्वी :- निखिल वानखडे

जगाला पोलिओमुक्त करण्याकरता रोटरी क्लब द्वारे करण्यात आलेले कार्य अतुलनीय असून समाजाप्रती असलेली जबाबदारी ओळखून 120 वर्षात अशाच प्रकारचे कार्य रोटरी क्लब द्वारे करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ कॉटन सिटी द्वारे वृक्षारोपणा बरोबर शासनाला जागा मागून त्या ठिकाणी रोटरी वन तयार करावे असे प्रतिपादन श्री डॉ पदमाकार सोमवंशी
यांनी रोटरी क्लब ऑफ कॉटन सिटी, आर्वी इनरव्हील क्लब, आर्वीच्या वर्ष २०24-25 पदग्रहण समारोह समारंभ प्रसंगी रुणीचा धाम, देऊरवाडा रोड, आर्वी येथे केले
कार्यक्रमाकारिता श्री विश्वास शिरसाट उपविभागीय अधिकारी, डॉ किरण सुकलवाड, मुख्याधिकारी न प आर्वी,डॉ जुगल चिरानिया डिस्ट्रिक्ट सचिव , रो. संकेत मोहता सह प्रांतपाल,रोटरी क्लब ऑफ कॉटन सिटी आर्वी 2023-24चे अध्यक्ष मनीष अग्रवाल, सचिव राजेश जैन , 2024-25 चे अध्यक्ष उमेश भुसारी,सचिव सुनिल बाजपेयी,इनरव्हील क्लब आर्वी अध्यक्ष वैशाली पाटणी, 2024-25 च्या अध्यक्ष, निशा मालानी, सचिव अर्चना सादानी उपस्थित होते
सन 2024 25 चे नवनिर्वाचित अध्यक्ष उमेश भुसारी व सचिव सुनील बाजपेयी तसेच इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा निशा मालानी, सचिव अर्चना सादानी यांनी पदभार स्वीकारला
रोटरी क्लब ऑफ कॉटन सिटीचे मावळते अध्यक्ष मनीष अग्रवाल व इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा
वैशाली पाटणी यांनी मागील वर्षात केलेल्या कार्याची तर नवीन अध्यक्ष उमेश भुसारी, निशा मालानी यांनी पुढील वर्षात करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमा संबंधीची माहिती दिली
उपविभागीय अधिकारी श्री विश्वास शिरसाट,आपल्या मार्गदर्शनात आर्वीच्या रोटरी क्लब व इनरव्हील क्लब ने शैक्षणिक सामाजिक व आरोग्य क्षेत्रामध्ये केलेल्या कार्याची प्रशंसा केली
डॉ जुगल चिरानिया रो संकेत मोहता यांनी आपल्या मार्गदर्शनात रोटरी क्लब द्वारे देशात व जगात करण्यात येत असणाऱ्या विविध कार्यक्रमासंबंधीची माहिती देऊन
रोटरी क्लब ऑफ कॉटन सिटी ला 25 वर्ष झाल्यामुळे जोमाने समाजाकरता कार्य करावे व रोटरी क्लबच्या सदस्यांनी समाजाची सेवा करण्याकरता प्रयत्न करावे असे आवाहन केले
डॉ किरण सुकलवाड यांनी नगरपालिकेद्वारे करण्यात येणाऱ्या कार्याला सहकार्य करावे असे आवाहन उपस्थिताना केले
श्रावण मासा मध्ये निर्मल्याची विल्हेवाट लावण्याकरता इनरविह्ल क्लब द्वारे निर्माल्य वाहनाची सुविधा देण्यात येणार असून त्या वाहनाचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते याप्रसंगी करण्यात आले
कार्यक्रमाचे संचालन व सर्वेश भार्गव व रवि मंशांनी
आभार सुनील बाजपेयी यांनी मानले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शहरातील विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी ,आमंत्रित व रोटरी क्लब ऑफ कॉटन सिटी, आर्वी इनरव्हील क्लब चे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close