वकीलांना अपमास्पद वागणूकीच्या,निषेधार्थ न्यायालयीन कामकाज बंद आंदोलन
अॕडीशनल एस.पी.कुमावत यांनी अपमान केल्याचा निषेध-
अंजनगाव सुर्जी, मनोहर मुरकुटे
अंजनगावसुर्जी च्या बार असोशिएशन मार्फत अंजनगावसुर्जी पोलीस स्टेशनच्या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ न्यायालयीन वकीलांचे कामकाज बंद ठेवण्याचा ठराव पारीत करत गुरुवारी दि.१४ रोजी न्यायालयीन कामकाज बंद ठेवल्याने न्यायालयात दिवसभर शुकशुकाट होता.
बारचे सदस्य अँड अनुराग वानखडे यांना अंजनगाव पोलिसांनी दि.१४/२/२०२४ च्या एफ.आय.आर.नुसार दि.१२/३/२०२४ ला भा.द.वी.च्या कलम ३५३ नुसार अटक केली. अटक केल्यानंतर त्यांना मारहाण केल्याचे मेडिकल रिपोर्टमध्ये निष्पंन्न झाल्यावर अॕड. अनुराग वानखडे यांना बारचे सदस्य अँड.एस.एस.भड व अॕड. ए.ए.वानखडे हे भेटण्यास गेले असता तेथे पांढरी प्रकरणाचे तपास संभदात उपस्थीत सहाय्यक एस.पी. कुमावत यांनी त्यांना अपमानास्पद वागणुक देऊन, तुम्ही पोलीस स्टेशन येथे का आलात, तुमचे येथे काही काम नाही, तुमचे काम कोर्टात आहे, तुम्ही आरोपीस कोर्टात भेटा, हे माझे अधिकार क्षेत्र आहे. माझ्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जा असे म्हटले,ही बाब त्यांनी अंजनगांवसुर्जी बार असोशीयनचे अध्यक्ष अँड.पी.एम. बोचरे यांचेकडे सदरच्या प्रकरणबाबत माहिती दिली असता, स्वतः अध्यक्ष व उपाध्यक्ष जी.टी. आमले हे स्वतः पोलीस स्टेशन ला गेले असता त्यांना सुद्धा याच अधीकाऱ्याने पोलीस स्टेशनच्या परीसरातुनच बाहेर जाण्यास सांगीतले,त्यामुळे वकिलांचा अपमान करुन, सदर अधिका-याने वकिलांच्या हक्क व अधिकारावर गदा आणली तसेच संबधीत आरोपीस न्यायालय अंजनगाव येथे हजर केले असता त्यांना मारहाण केल्यावर, विद्यमान न्यायालयाने त्याबाबत मेडिकल केले असता मेडिकलमध्ये मारहाण झाल्याचे निष्पन्न झाल्यावर या सर्व कृत्याचा निषेध म्हणुन दि. १४ रोजी न्यायालयाचे वकिलांचे कामकाज संपूर्ण दिवसभर बंद ठेवून झालेल्या घटनेचा निषेध केला,बंद मधील समाविष्ट वकींलांच्या म्हणन्यानुसार फौजदारी कलम संहितेच्या कलम ४१ ड प्रमाणे अटक असणा-या व्यक्तीस त्याच्या निवडीच्या वकिलास भेटण्याची तरतुद आहे तसेच कलम ५०अ फौजदारी कलम संहितेनुसार अटक केलेल्या व्यक्तीस ताबडतोब त्याचे मित्र, नातेवाईक, वकिल यांना त्याच्या अटकेची कारणे व त्याबाबतची माहिती देणे कायद्याने बंधनकारक आहे व तशी तरतुद कायद्यात आहे. सदर अधीकाऱ्याने कायद्याची अवहेलना फौजदारी संहितेच्या दोन्ही कलमांचा भंग केला व त्यानुसार कलम १६६अ भा.द.वी.प्रमाणे गुन्हा केला असुन तो दोषारोपास कारणीभूत असल्याने,या अधीकाऱ्याची जिल्हा मुख्य न्यायाधीश,बार काऊन्सील आॕफ महाराष्ट्र अॕन्ड गोवा,गार्डीयन जस्टीस बाॕम्बे हायकोर्ट नागपुर बेंच कडे तक्रार करण्यात येनार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले असुन,झालेल्या घटनेचा वकिल संघाचे अध्यक्ष, पदाधिकारी व सदस्याकडुन तिव्र जाहिर निषेध करण्यात आला आहे.