अपघात

ऋतुजाची मृत्यूशी झुंज अखेर संपली 

Spread the love

15 दिवसांपासून सुरू होते उपचार 

वैराग / नवप्रहार न्यूज

                        ऋतुजाची मृत्यूशी झुंज अखेर संपली. ऋतुजा आपल्या काकांच्या दुचाकीवर घराकडे जाण्यास निघाली असता त्यांची दुचाकी आणि उसाच्या मळीने भरलेल्या ट्रॅक्टर मध्ये अपघात झाला होता. त्यात ऋतुजा गंभीर जखमी झाली होती. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. विशेष म्हणजे ऋतुजा वैद्यकीय शिक्षण घेत होती. 

वैराग (ता. बार्शी) येथे अतुल मोहिते हे ३१ जानेवारी रोजी पुतणी ऋतुजा अजित मोहिते ( वय १९) हिला घेऊन मोटारसायकलवरून घराकडे निघाले होते. त्यावेळी हिंगणी रोडवर उसाच्या मळीने भरलेला ट्रक्टर व मोटरसायकल यांच्यात अपघात झाला. त्यामध्ये ऋतुजा हिच्या उजव्या पायाच्या मांडीला गंभीर जखम झाली, तिचा डावा कान तुटला व डोक्याला गंभीर मार लागला होता.

ती सध्या वैद्यकीय शिक्षण घेत होती तसेच चुलते अतुल मोहिते देखील जखमी झाले. ऋतुजाला सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र १५ दिवसांपासून तिची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली व तिचा शनिवारी सकाळी तिचा मृत्यू झाला. सदर अपघातातील ट्रॅक्टर चालकावर वैराग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close