क्राइम
रायफल ट्रेनर मोहसीन खान याच्यावर १०० हून अधिक मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप.
मोबाईल मध्ये सापडले अश्लील व्हिडिओ
मांसाहारी पदार्थ खाण्यासाठी टाकायचा दबाब.
इंदूर / नवप्रहार ब्युरो
मुस्लिम तरुणांकडून कधी हिंदू नाव धारण करून तर कधी सोबतच्या मुलींच्या साह्याने हिंदू मुलींना टार्गेट करून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचे काही प्रकार मागील काही काळात उजेडात आले आहेत. हिंदू मुलींना येनकेन प्रकारे आपल्या जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण करून त्याचे व्हिडिओ बनवून त्याद्वारे वारंवार लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघड झाला आहे. यामध्ये आता नवशाद खान याचे देखील नाव सामील झाले आहे.
रायफल ट्रेनर असलेल्या मोहसीन खानने आतापर्यंत 100 हून अधिक मुलींचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी मोहसीनला केली असून त्याची कसून नौकशी केली जात आहे. माहसीन खानने खेळाच्या नावाखाली असंख्य मलींना भीती दाखवून त्यांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप होत आहे. मोहसीन खानने मुलींवर केलेल्या लैंगिक अत्याचाराचे काही व्हिडिओही समोर येत आहेत.
कोण आहे मोहसीन खान ?
मोहसीनचा जन्म एका लष्करा कुटुंबात झाला. त्याचे वडील रतीय सैन्यात सुभेदार होते. महू येथे तैनात असताना ते लष्करी कर्मचाऱ्यांना रायफल शूटिंगचे प्रशिक्षण देत असत. आज ते अर्धांगवायूने ग्रस्त असून निवृत्त झाले आहेत. मोहसीन खान हा तीन भावांपैकी सर्वात लहान आहे. शाहिद, इम्रान आणि मोहसीन हे तिघेही रायफल शूटिंगचं प्रशिक्षण देतात. मोहसीनने इंदूरम शाहिद नावाची शूटिंग अकादम सुरू केली, जिथे मुलांना शूटिंग शिकवले जात असे.
शुटिंगच्या आडून शोषणाचा सापळा
मोहसीनवर 100 हून अधिक मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. तो मुलींना शूटिंगचे वैयक्तिक प्रशिक्षण देण्याच्या बहाण्याने बोलवायचा. त्यांच्या धर्मावर अपमानास्पद भाष्य करायचा आणि विशेषतः हिंदू मुलींवर मांसाहारी पदार्थ
खाण्यासाठी दबाव आणायचा. या संपूर्ण प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे बहुतेक मुलींनी वर्षानुवर्षे हा मानसिक छळ शांतपणे सहन केला, पण आता एकामागून एक अनेक तक्रारी समोर येत असताना, पोलिसांनी आतापर्यंत त्याच्या अकादमीशी संबंधित 4 यादी तयार केली आहे. पोलीस याता या मुलींची चौकशी करणार आहेत.
लैंगिक शोषणासह आर्थिक घोटाळे
मोहसीनने मध्य प्रदेश रायफल शूटिंग असोसिएशनमध्येही घोटाळे केल्याचं तपासात समोर आलं आहे. मोहसीन पैसे घेऊन श्रीमंत विद्यार्थ्यांना स्पर्धांमध्ये संधी देत असे, ज्यामुळे गरीब पण प्रतिभावान खेळाडू राहत असत. याशिवाय, बरवानी साझामध्ये त्याची आणखी एक शूटिंग संस्था बंद आढळली.
अटकेनंतर आरोपीचे संपूर्ण कुटुंब फरार झाले आहे. त्याचे दोन्ही भाऊ शाहिद आणि इम्रान इंदूरच्या नामांकित शाळांमध्ये शूटिंग प्रशिक्षक आहेत. या संपूर्ण प्रकरणात कुटुंबातील इतर सदस्यांचाही सहभाग असू शकतो, असा पोलिसांना संकाय आहे. मोहसीन हा महू येथील धार नाक्याजवळील प्रजापती ार येथील रहिवासी आहे.e