अंजनगावसुर्जी कृउबासं निवडणुकीत सहकार पॕनलची एकहाती सत्ता
१८ पैकी १७ उमेदवार विजयी- -** परीवर्तण ला मतदारांनी नाकारले,
एकच उमेदवार झाला विजयी –
अंजनगाव सुर्जी (मनोहर मुरकुटे )
अंजनगाव सुर्जी कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणुकीसाठी एक हजार चारशे बाव्वन्न मतदार संख्या असलेल्या अंजनगांवसुर्जी कृषी उत्पन्न बाजार समीती निवडणुकीत एक हजार चारशे चौतीस मतदारानी १८संचालक पदाचे दावेदारी करीता मतदानाचा हक्क बजावला, यात ९८.७६टक्के मतदान झाले,ग्रामपंचायत मतदारसंघातुन ४२८पैकी४२४ मतदारानी,सेवा सहकारी संस्था मतदार संघातुन६८७पैकी ६७८ मतदारांनी, व्यापारीअडते मतदारसंघातुन ६६पैकी ६४ मतदारानी तर हमाल मापारी मतदार संघातुन २७२ पैकी २६८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
सायंकाळी अत्यंत अटीतटीच्या निवडणुकीत मोजनी सुरु झाल्यावर प्रथम मोजनि झालेल्या व्यापारी अडते मतदारसंघातुन शंकरराव चोरे,३१ चंद्रशेखर शेळके३५ मते घेऊन
विजयी झाले तरआशिष राठी २८ पंकज मोदी २८ ज्ञानेश्वर पोटदुखे ३मते घेऊन पराभुत झाले. हमाल मापारी मतदारसंघातील शेख जमील शेख रहेमान९१ मते घेऊन विजयी तर विरोधी
मुजफ्फर अली सय्यद अली ६१सै नईम८४ मते घेतपराभुत झाले.
ग्रामपंचायत मतदारसंघातुन सहकारचे प्रदिप इंगळे १७० मते घेत वीजयी झाले तर परीवर्तणचे उमेदवार प्रेमदास हिरोळे १६७ मते घेऊन पराभुत झाले,हरिश सरदार ४२,शकुंतला वानखडे८,(अपक्ष) मते मीळाली,ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल मतदार संघातुन परीवर्तण चे एकमेव उमेदवार रवी उपाध्ये १५५ मते घेत सहकारचे शशिकांत मंगळे(१३८ )यांना पराभूत केले ,यात शेतकरी पॕनलचे प्रदीप येवले ९४,रवि बोद्रे,००,मते पडली.
सर्वसाधारण मतदार संघातुन सहकाराचे अमर शिंगणे (१४८)अनंता रोकडे (१४८) मते घेऊन विजयी झाले यात परीवर्तण चे नितीन पटेल (१४६)व विनोद घोगरे १४६ मते मीळवुन त्यांना पराभव स्विकारावा लागला.
सोसायटी मतदार संघ इतर मागासवर्ग मतदार संघातून सहकार पॅनलचे सुरेश आडे यांना ३३६मते तर परिवर्तन पॅनलचे जगन दादा हरणे यांना३१५ मते पडले,सुरेश आडे यांचा वीस मताने विजयी तर, भटक्या विमुक्त मतदार संघातुन सहकाराचे विशाल पंडीत३४१मते मीळवुन परीवर्तणचे स्वप्नील घुरडे २९८ यांचापराभव केला.महीला मतदारसंघातील सहकारच्या शारदा ढोक यांना ३५०मते, पुनम पोटे यां ३३६ मते मीळवुन विजयी झाल्या तर परीवर्तण च्या रजनी काळमेघ ,२८५ सुवर्णा रिंगणे २८०यांचा पराभव झाला. सर्वसाधारण मतदारसंघातुन सहकाराचे सर्वच्या सर्व जयंतराव जी.साबळे(३६४), सुरेश ना.राऊत,(३१९)अविनाश सदार (३२७),विजय द.कळमकर,(३०८) विकास म. येवले(३३१ )संजय काळमेघ(३२१), सागर घोगरे ( ३२९)विजयी घोषीत करण्यात आले.तर परीवर्तणचे उमेदवार सुधिर गो.अढाऊ( २९९), रामभाऊ काळमेघ,(३०७)कुलदिप नळकांडे, (२८९)राजेंद्र भारसाकळे (२७५),अजिक्य सं.महेकरे, (३००)विनायक वाघ(२६२)शरद रा.साबळे(२६३) या सर्व उमेदवारांचा पराभव झाला.परीवर्तण चे चार उमेदवारांनी फेरमोजणी (रीकांउंटींग)मागतल्याने बातमी लीही पर्यत मत मोजनी सुरु होती.