सामाजिक
पारवा येथिल सेवानिवृत्त तलाठ्यांच्या गावातील शेतक-यांनी घेतला निरोप समारंभ.
घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार
वृत्त-पारवा येथील तलाठी श्री पेंदोर हे सेवानिवृत्त झाले. कर्तव्यात असतांना त्यांनी पारवा येथील शेतकऱ्यांना सन्मानजनक वागणूक देत सर्व योजनांची माहिती शेतकऱ्यांना वेळोवेळी दीली व शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील केलेत त्यांचा या कार्याची दखल घेत पारवा येथील शेतकऱ्यांनि तलाठी श्री.पेंदोर निरोप समारंभ घेत शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते गणेश मुद्दलवार,ग्रा.प.सदस्य बालाजी पोटपेललिवार,ग्रा.प.सदस्य राजू दवणे,महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्ष श्री.निकम साहेब,शेतकरी शंकर डंबारे,गजानन जिल्लडवार,रामदास काकडे,महादेव राजूरकर,दत्ता बिरकुरवार,संतोष कापसे,मनोज शेरलावार,रमेश दोंडावार सह इतरही शेतकरी उपस्थित होते.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1