सामाजिक
स्त्री शक्तीचा आदर ही समाजासाठी अभिनंदनीय बाब – राज्यपाल रमेश बैस
राज्यपाल यांच्या उपस्थितीत स्त्री शक्ती पुरस्कार सोहळा संपन्न
राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर फाउंडेशन चे आयोजन
चांदुर रेल्वे / प्रकाश रंगारी
अमरावती येथे राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर फाउंडेशन च्या वतीने ‘ स्त्री शक्ती ‘ पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे राज्यपाल रमेशजी बैस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार , महिला व बालविकास मंत्री आदीतीताई तटकरे यांच्या उपस्थितीत अमरावती येथील सांस्कृतिक भवनात हा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.
2023 च्या अहिल्यादेवी स्त्रीशक्ती सोहळ्याच्या मानकरी ठरल्या लेबर कोर्ट लेबर एनर्जी विभाग मंत्रालयात कार्यरत प्रिन्सिपल सेक्रेटरी विनिता सिंगल , आयएएम पार्श्व गायिका वैशाली माडे , उद्योजिका स्नेहल लोंढे , आंतरराष्ट्रीय बेसबॉल संघाची कर्णधार रेश्मा पुणेकर , महिला शेतकरी ज्योती देशमुख या ठरल्या. विनीता सिंगल सन 1996 च्या महाराष्ट्र कॅडर च्या आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी जिल्हाधिकारी पदापासून ते शासनाच्या विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. सध्या त्या लेबर कोर्ट लेबर एनर्जी विभागात प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणून कार्यरत आहेत.
गायिका वैशाली माडे या अमरावती जिल्ह्यातील खार तळेगाव येथील एका गरीब कुटुंबातील असल्याने त्यांचा सिनेसृष्टीतील प्रवास अत्यंत खडतर आणि कष्टदायक आहे. यासाठी त्यांना अथक मेहनत आणि परिश्रम घ्यावे लागले आहे.
उद्योग क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या स्नेहल लोंढे यांनी एमबीए ची पदवी घेतक्यावर हॅन्डग्लोज निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवले. बारामतीच्या एका मेंढपाळ धनगराच्या घरात समाजा भरलेली लहानपण उस तोडणे आणि मेंढ्या चारने यात खर्ची घाटलेली रेश्मा शिवाजी पुणेकर हिने स्वतःच्या शक्तीने झांतराष्ट्रीय बेस बोल संघाचे कर्णधार पद मिळविले. नुकताच तिचा छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार देवून शासनाने गौरव केला. तिने हॉंगकॉंग येथे येथे एशिया कपचे प्रतिनिधीच केले.
अकोला जिल्ह्यातील कट्यार गावातील एक शेतकरी महिला जिच्या कुटुंबातील सासरे ,पती आणि दिराने कर्जाच्या बोज्यापायी आत्महत्या केली. या आघाताने खचून न जाता तिने स्वबळावर 29 एकर शेती कसण्याचा निर्णय घेतला. जिने ट्रॅक्टर चालवायला शिकले.आणि हे सिद्ध केले की एक महिला देखील कर्तृत्वाने शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवू शकते. यामुळे ज्योतिताई देशमुख समाजात आदर्श ठरल्या आहेत.
आज या सर्व श्री सक्तीचा सन्मान व सत्कार” महामहीम राज्यपाल मा० रमेशत्री वैस, उपमुख्यमुश्री माः अजितदाम पवार राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री मा. अदिती तटकरे संजय महात्मे यांनी स्मृतिचिन्ह देऊन केला. सत्कार मूर्तीच्या जीवनानावर आधारित चित्रफीत दाखविण्यात आली. या सोहळ्याला आ. प्रवीण पोटे ,आ.यशोमतीताई ठाकूर , राज्य महिला आयोगाच्या सदस्या आभा पांडे , जेष्ठ मेंढपाळ महिला इंदूताई शिंदे या प्रामुख्याने उपस्थित होत्या.
राज्यपाला मा रमेशजी बैस यांनी ” राष्ट्रमाता अहिल्यादेवी फाऊंडेशन च्या कार्याचे भरभरून कौतुक केले. संतोष भाऊ महात्मे यांच्या सामाजीक जानीवेणुन महीलांच्या सन्मानाला, तसेच स्त्री शक्तीचा सन्मान करणाऱ्या या चेतनामयी उपक्रमाला सुयश चिंतीले.
या प्रसंगी उपमुख्यमंत्री मा. अजितदाहा पवार यांनाही अहिल्यादेवी स्त्री सक्तीचा सम्मान सोहळ्याचे शक्ती पुरस्कार सोहळ्याचे भरमरून कौतुक केले. तसेच मागील वर्षी सुद्धा या सोहळ्याला उपस्थित राहायचा योग आला, याचा आवर्जुन उल्लेख केला.
महीला व बाल विकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनीही महीलांच्या सुप्त शक्तीचा जेव्हा उदय होतो तेव्हा अख्या समाजाला सिमीत करेल असे काम महीला करून जातात स्त्री पुरूष या समानतेच्या युगात महीला कुठेही मागे नाहीत असे गौरवउदगार काढून कार्यक्रमाचे कौतुक केले.
या कार्यक्रमाची सांगता प्रेरणागीत व राष्ट्रगीताने झाली सतोषभाऊ महात्मे समवेत डो. गणेश काळे, माधुरी ढवळे, अनुश्री ठाकरे, रविंद्र गोरटे, संदीप राठी, जानराव कोकरे सुषमा विसने, ज्योती वानखेडे मेघश्याम करडे – पल्लवी लोंढे, निखीलठाकरे व प्रविण भुजाडे जजनात तलीत अजीज पटेल यांनी अथक परिश्रम घेतले.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1