हटके

निवासी महिला डॉक्टरचे आंघोळ करतांना चित्रीकरण ? महिला डॉक्टर ची तक्रार 

Spread the love

नागपूर / नवप्रहार वृत्तसेवा

                     निवासी डॉक्टरां साठी असलेल्या वस्तीगृहात महिला डॉक्टर आंघोळ करतानाचे पुरुष डॉक्टर कडून चित्रीकरण करण्यात आल्याची तक्रार करण्यात आल्याने खळबळ माजली आहे. या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आल्याचे समजत आहे.

मेडिकलमध्ये निवासी डॉक्टरांसाठी स्वतंत्र वसतिगृह असून महिला व पुरुष डॉक्टरांच्या निवासाची सोय आहे. गुरुवारी (दि. १३) रात्री द्वितीय वर्षाला असलेली महिला निवासी डॉक्टर आंघोळीला गेली असताना एका निवासी डॉक्टरने मोबाईलमध्ये व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न केला. याविषयीची शुक्रवारी (दि. १४) दुपारनंतर अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांच्या कार्यालयात तक्रार करण्यात आली. तातडीने वसतिगृहाचे वॉर्डन डॉ. गौर व निवासी डॉक्टरांच्या प्रतिनिधींसह बैठक घेत संबंधित डॉक्टरच्या मोबाईलची तपासणी केली असता कोणतेही छायाचित्र वा चलचित्र आढळले नाही. तातडीने चौकशीसाठी उपअधिष्ठाता डॉ. देवेंद्र माहोरे, उपअधिष्ठाता डॉ. उदय नारलेवार, डॉ. अर्चना देशपांडे, डॉ. गौर, डॉ. मनीष ठाकरे, डॉ. जयेश मुखी यांची सहा सदस्यीय समिती गठीत करण्यात आली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close