सामाजिक

पत्रकारांची शासन दरबारी नोंद व्हावी याकरिता तहसीलदार यांच्या मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन

Spread the love

न्याय हक्क मागणीसाठी पत्रकाराने ठरविला नऊ ऑगस्ट क्रांती दिवस.
नेर:- नवनाथ दरोई
ग्रामीण व शहरी भागात अनेक वर्षापासून प्रत्रकार कार्यरत आहे. अशा पत्रकारांची शासन दरबारी नोंद व्हावी यासाठी पाॅवर ऑफ मीडियाच्या वतीने महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात वृत्तपत्र प्रतिनिधी, पत्रकार, दृकश्राव्य, केबल ऑपरेटर,लोकर न्यूज होल्डर, याची एकमेव प्रत्रकार म्हणून संघटना कार्यरत आहे.प्रत्रकारांनी नऊ ऑगस्ट क्रांती दिवस म्हणून ठरविला आहे. या क्रांती दिनाच्या औचित्य साधून अमरावती येथे 9 ऑगस्ट 2020 ला क्रांती मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात त्यावेळचे तात्कालीन आमदार खासदार, पालकमंत्री व आजी-माजी आमदार खासदार उपस्थित होते. विशाल मोर्चातील 580 पत्रकारांना त्या नेत्यांनी मार्गदर्शन केले. तसेच पत्रकाराचे मार्गदर्शन करताना नेते मंडळी असे म्हणाले होते की, सर्वच प्रत्रकारांची शासश दरबारी नोंद होण्यासाठी आम्ही सर्व राजकीय मंडळी अभिवचन देतो.कोरोनाच्या पार्श्वभूमी नंतर दोन वर्ष कुठल्याही मोर्चा किंवा अधिवेशन घेता आले नाही. शासन दरबारी आमची नोंद होऊन आम्हाला आमचा हक्क मिळावा यासाठी हे निवेदन राष्ट्रपती यांच्यापर्यंत पोहोचवावे यासाठी प्रशासकीय अधिकारी, नेर तहसीलचे तहसीलदार शिवाजी मगर यांना देण्यात आले.निवेदन देतेवेळी लोकमतचे तालुका प्रतिनिधी किशोर वंजारी, दैनिक भास्करचे तालुका प्रतिनिधी वसीम मिर्झा, दैनिक देशोन्नती चे तालुका प्रतिनिधी निलेश वाहने, प्रवीण रामटेके, दैनिक विदर्भ कल्याणचे तालुका प्रतिनिधी अंकुश रामटेके, नवप्रहार प्रतिनिधी रेणुका जयस्वाल, फोटोग्राफर धम्मपाल तलवारे,विजय दरोई, राजेंद्र दरोई, पाॅवर ऑफ मीडियाचे नेर तालुका अध्यक्ष नवनाथ दरोई व अन्य प्रत्रकार उपस्थित होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close