सामाजिक

विदर्भ मिल परिसरातील विवीध समस्यांविषई मुख्याधिकाऱ्यांना निवेदन 

Spread the love

बिल्डरांनी सांडपाण्याचा नाला अडवीला , कारवाई करण्याची मागणी#
भाजप पदाधिकारी झाले आक्रमक

अचलपुर प्रतिनिधी -किशोर बद्रटिये : – अ वर्ग नगरपालीका असुन सुद्धा नगरपालिका हद्दीत अनेक समस्या जैसे थे आहेत अनेकदा सुचना देऊनही समस्यांचे निराकरण होत नसल्याने भाजपा कार्यकर्त
आक्रमक होत आज 23 नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पार्टी अचलपूर शहर मंडळ तर्फे नगरपरिषद अचलपूर येथे मुख्याधिकारी श्री धीरज गोहाड यांना विवीध समस्यांचे निवेदन देत ताक्राळ समस्यांचे निराकरण करण्यासाठी भेटले .
अचलपुर परतवाडा शहरात नागरीकांना स्वस्छाता साफसफाई , लाईट , पाण्याच्या अनेक समस्या उदभवत असलेलाने भाजपचे शिष्टमंडळ मुख्य धिकार्‍यांना भेटत समस्या मांडल्या विदर्भमिल परिसर येथील विवेकानंद कॉलनी ,एकता नगर व अमरावती रोड याला लागून मोठा नाला कॉटन मार्केट कृषी उत्पन्न बाजार पासून सुरु होत असून मोती मंगल कार्यालय समोरून वाहून विवेकानंद कॉल कॉलनीच्या परिसरामध्ये जाऊन बंद झालेला आहे. कारण की पुढे एक मोठ्या स्वरूपाचे बांधकाम कमर्शियल कॉम्प्लेक्स सुरू असल्यामुळे नाल्यातल पाणी पुढे जात नाहीये आणि याची तक्रार नगरपरिषद मध्ये अनेकदा करून सुद्धा नगरपालिकेचे याकडे दुर्लक्ष केले आहे. शेवटी आज भारतीय जनता पार्टी अचलपूर शहर अध्यक्ष कुंदन यादव तसेच भाजपाचे गजानन कोल्हे मनोज जामनेरकर माजी नगरसेवक विदर्भ मिल शंकर भाषांनी प्रफुल कुरेकर ललित ठाकूर भूषण हिरुळकर ललित चंदनकर मनीष समुंद निलेश नागापुरे इतर कार्यकर्त्यांनी जाऊन थेट मुख्याधिकारी धीरज गुहाळ यांच्याशी चर्चा करून आठ दिवसात सदर नाला निकाली काढण्याचे आवाहन केले आहे. त्याच प्रकारे विदर्भ मिल चौकामध्ये गेल्या तीन वर्षापासून जुनी चाळ येथून नारायणपूर चौकापर्यंत स्ट्रीट लाईट कायमस्वरूपी बंद पडलेले आहे याआधी कुंदन यादव व मनोज जामनेकर यांनी या विषयावर जुने मुख्याधिकारी श्री फातले साहेब यांना दोन वेळा अर्ज देऊन सुद्धा हे काम झालेलं नाही. त्याकरिता सुद्धा गोहाळ साहेबांना तातडीने स्ट्रीट लाईट सुरु करणे करिता विनंती करण्यात आली आहे तसेच विदर्भ मिल परिसरामध्ये सातत्याने वॉटर सप्लाय च्या पिण्याच्या पाण्याची अडचण नेहमीप्रमाणे अजूनही सुरूच असल्यामुळे दररोज विदर्भ मिल परिसरातील नागरिकांची पाण्याच्या फोर्स बद्दल तक्रारी सुरू असतात या विषयावर सुद्धा मुख्याधिकारी श्री धीरज गोहाड यांच्या समक्ष समस्या मांडला . पिण्याच्या पाण्याची याआधी सुद्धा मुख्याधिकारी साहेब यांना दोन ते तीन वेळा तक्रार केली असून त्यांनी या विषयाचा गांभीर्याने लक्ष दिले नाही त्याकरिता आज भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी श्री धीरज गुऱ्हाड मुख्यदीप खारी अचलपूर नगरपरिषद यांना या सर्व विषयांवर त्वरित मार्ग काढावा व सर्व प्रश्नांची सर्व अडचणी त्वरित संपावी याकरिता विनंती केली. श्री धीरज गोहाड मुख्याधिकारी नगरपरिषद अचलपूर यांनी पंधरा दिवसाच्या आत सर्व सांगितलेली कामे होण्याची आश्वासन दिले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close