बरडघाट येथे महिला दिन साजरा
चिमूर प्रतीनिधी / ज्ञानेश्वर जुमनाके
जि. प. प्रा. शाळा, बरडघाट येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बरडघाट येथील fc ज्येष्ठ महिला अंजनाबाई दोडके होत्या. प्रमुख अतिथी म्हणून उपक्रमशील शिक्षक प्रकाश कोडापे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कवडू बारेकर,सदस्य आशा पोईनकर,अंगणवाडी सेविका पद्मा रिनके, पालक करुणा मेश्राम, मनीषा मेश्राम, सोनाली बारेकर, सरिता भोयर, सोनाली मेश्राम, अंजना कामडी, सुनीता बारेकर, गंगाबाई दोडके, मुख्याध्यापक सुरेश डांगे उपस्थित होते.
प्रमुख अतिथी प्रकाश कोडापे यांनी महिलांना आपल्या पाल्यावर चांगले संस्कार देणे गरजेचे असून तेच आपले भवितव्य आहे. त्यामुळे त्यांच्यावर चांगले विचार सांगणे गरजेचे आहे.ज्या समाजातील महिला जागृत असतात तो समाज प्रगती करीत असतो. त्यामुळे महिलांनी जागृत राहण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन प्रकाश कोडापे यांनी केले.त्यांनी महिला दिनावर कवितेचे वाचन केले.सुरेश डांगे यांनी महिला दिनानिमित्त उपस्थितांना मार्गदर्शन केले व कविता सादर केली.अध्यक्षीय भाषण अंजनाबाई दोडके यांनी केले.प्रकाश कोडापे यांनी बरडघाट शाळेतील विद्यार्थ्यांना नोटबुक व पेनचे वितरण केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सुरेश डांगे यांनी केले. संचालन व आभारप्रदर्शन अर्चना डफ यांनी केले. कार्यक्रमाला विद्यार्थी उपस्थित होते.