राजकिय

शिंदेंचा सभा घेण्यास नकार आणि उमेदवार रुग्णालयात 

Spread the love
 

अहिल्यानगर  / नवप्रहार डेस्क 

                         श्रीरामपूर मतदार संघात मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळणार आहे. कारण या मतदार संघात अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उमेदवार दिला असून त्यांच्यात थेट लढत आहे. पण शिंदे गटाच्या उमेदवारांल साठी शिंदे यांनी सभा घेण्यास नकार देतात उमेदवाराचा रक्तदाब वाढला . आणि त्याला रुग्णालयात भरती करावे लागले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  हे भाऊसाहेब कांबळे यांच्यासाठी सभा घेणार होते. मात्र आज होणारी सभा अचानक रद्द झाल्याने शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांचा अचानक रक्तदाब वाढला असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

श्रीरामपूर विधानसभेत महायुतीतील दोन उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून भाऊसाहेब कांबळे तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून लहू कानडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी लहू कानडे यांच्यासाठी राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी सभा घेतली होती. आज भाऊसाहेब कांबळे यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र ऐनवेळी सभा रद्द झाल्याने भाऊसाहेब कांबळे यांनी टेन्शन घेतले असून काल रात्रीपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर दुसरीकडे  श्रीरामपूरला लागून असलेल्या नेवासा मतदारसंघातील उमेदवारासाठी थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांची सभा पार पडणार आहे. श्रीरामपूर येथील सभा ऐनवेळी रद्द करण्याचे कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

काय म्हणाले भाऊसाहेब कांबळे?

नियोजित सभा ऐनवेळी रद्द झाल्याने भाऊसाहेब कांबळे रक्तदाब वाढला आहे. भाऊसाहेब कांबळे यांच्यावर श्रीरामपूर शहरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत एबीपी माझाशी बोलताना भाऊसाहेब कांबळे म्हणाले की, जिल्ह्यातील काही नेत्यांचा माझ्यावर दबाव आहे. मला उमेदवारी देणारे हेच लोकं आणि मागे घ्यायला लावणारे हेच लोकं आहेत, असे म्हणत त्यांनी राधाकृष्ण विखे पाटलांवर नाव न घेता टीका केली. पक्षाने मला एबी फॉर्म दिला आहे. त्यामुळे मी धनुष्यबाणाची उमेदवारी करणारच आहे. माझ्या पक्षाच्या नेत्यांनी सांगितले असते तर मी माघार घेतली असती. सर्वसामान्य जनता माझ्यासोबत आहे. मी निवडणूक लढवणारच आहे, असेही भाऊसाहेब कांबळे यांनी म्हटले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close