क्राइम

धक्कादायक …. पत्नी समोरच तो ठेवायचा सख्ख्या बहिणी सोबत सबंध 

Spread the love

भोपाळ / विशेष प्रतिनिधी

चौकशी साठी आलेल्या महिला आयोगाच्या सदस्यांचे डोळे त्यावेळी विस्फारल्या गेले जेव्हा एका महिलेने तिच्यावर होत असलेल्या अत्याचाराबाबत त्यांना सांगितले. या प्रकारामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्यासमोर आलेल्या या तक्रारीने नात्यांवरच गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

जबरदस्तीने रुममध्ये बसवले जाते

एका पीडित महिलेने तिचा पती स्वतःच्या सख्ख्या बहिणीसोबत शारीरिक संबंध ठेवत असल्याचा गंभीर आरोप केला. इतकेच नव्हे तर, हे कृत्य सुरु असताना तिला जबरदस्तीने त्याच रुममध्ये थांबायला लावले जात असल्याचेही तिने नमूद केले. मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये सुरु असलेल्या महिला आयोगाच्या जनसुनावणीदरम्यान हा प्रकार समोर आला.

पोलिस कारवाईला का घाबरतात?

पीडितेने प्रशासनावर ताशेरे ओढताना सांगितले की, तिने या प्रकरणाबाबत पोलीस आणि सासरच्या मंडळींकडे वारंवार मदतीची याचना केली, मात्र कोणीही तिला साथ दिली नाही. उलट पोलिसांनी तिची तक्रार नोंदवण्यासही नकार दिला. तक्रार नोंदवायला पोलिस का घाबरतात हे मला समजत नसल्याचंही पीडितेने सांगितले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना या प्रकरणाची सखोल चौकशी करून तात्काळ कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

विजया रहाटकर काय म्हणाल्या?

आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी स्पष्ट केले की, ज्या महिला दिल्लीतील मुख्यालयापर्यंत पोहोचू शकत नाहीत, त्यांच्यासाठी आयोग स्वतः विविध राज्यांमध्ये जाऊन जनसुनावणी घेत आहे. महिलांच्या सुरक्षा आणि न्यायाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी दिला. यावेळी जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत अनेक कौटुंबिक वादांवर घटनास्थळीच तोडगा काढण्यात आला. जनसुनावणीत आलेल्या या तक्रारींनी राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेबाबत आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close