हटके

वाघ आणि सिंहाशी टक्कर घेणाऱ्या त्या प्राण्यांचे तुम्हीही कराल कौतुक 

Spread the love

मुंबई  / विशेष प्रतिनिधी

                 सिंह जंगकाचा राजा आहे. वाघ आणि सिंह  जंगलात यांच्याशी पंगा घ्यायला चांगले चांगले घाबरतात. पण सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओ ने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. चला तर पाहू या काय आहे प्रकरण ? .

आता कल्पना करा की जर सिंह आणि मुंगूस समोरासमोर आले तर काय दृश्य असेल? यासंबंधीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये सिंहाच्या समुहामध्ये मुंगूस येतो आणि तो सिंहिणीशी पंगा घेतो. मुंगूस सिंहिणीच्या समोर ठाम उभा राहतो. एवढेच नाही तर सिंहीण हल्ला करण्याआधीच त्याने हल्ला करण्यास सुरुवात केली.

वन्य प्राण्यांशी संबंधित या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की मुंगूस पाहताच अनेक सिंहीनी त्याला घेरलं. असे दिसते की मुंगूस जमीनीच्या आत एका बिळात होता आणि तेथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता. त्याचवेळी सिंहिणींची त्याच्यावर नजर पडली. त्यानंतर एका सिंहिणीने मुंगूसाची छेड काढण्यास सुरुवात केली. पण मुंगूसानेही हिंमत दाखवली आणि सिंहीणीसमोर खंबीरपणे उभा राहिला. मुंगूसाचे हे धाडस पाहून सिंहीण मागे हटू लागली पण आता मुंगूसाचे मन तापले होते. त्याने सिंहिणीचा पाठलाग केला आणि तिला त्रास द्यायला सुरुवात केली. तेव्हा एकदा दोनदा सिंहिणीने मुंगसाला मरलं, पण त्याची हिंमत पाहून सिंहिनीने देखील त्याला मारण्याची हिंमत केली नाही.

सिंह आणि मुंगूसशी संबंधित हा व्हिडिओ @TheFigen_ नावाच्या अधिकृत X हँडलवर अपलोड करण्यात आला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये ‘इसे बोलते हैं सही’ असे लिहिले आहे. काही सेकंदांचा हा व्हिडिओ 7 जानेवारीला पोस्ट करण्यात आला होता. याला आतापर्यंत 25 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. लोकांनी हा व्हिडीओ वारंवार पाहिला आहे आणि लोकांना शेअर देखील केलं आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close