केरळ मध्ये झाली श्रद्धा हत्याकांड ची पुनरावृत्ती
गुगल सर्च हिस्त्रीमुळे झाला खुनाचा खुलासा
केरळ / नवप्रहार न्यूज नेटवर्क
काही दिवसांपूर्वी मुंबईच्या श्रद्धा वालकर या तरुणीची हत्या तिचा प्रियकर आफताब पुनावाल यांने दिल्लीत करुन तिच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे करुन ते फेकून दिले होते. हे हत्याकांड खूप गाजले होते. असेच हत्याकांड केरळ मध्ये सुद्धा घडले आहे. या घटनेचा खुलासा ३ वर्षानंतर झाला आहे. महत्वाचे म्हणजे गुगल सर्च हिस्ट्रीतुन हे हत्याकांड उघड झाले आहे.
यामध्ये बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडची हत्या केली. त्यानंतर तिचे तुकडे केले, तसंच तिच्या हत्येचे पुरावेही नष्ट केले. मात्र गुगल सर्च हिस्ट्रीने सगळं काही वास्तव समोर आलं. पोलिसांनी या खुन्याला अटक केली आहे. त्याला आता जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
या प्लॅनिंगबद्ध हत्याकांडा विषयी अधिक माहिती अशी की या हत्याकांडातील प्रमुख पत्र प्रशांत नांबियार हा पेशाने संगीत शिक्षक होता. तर खून झालेली सुचित्रा पिल्लई ही त्याची प्रेयसी होती. सुचित्रा ही ब्युटीशीयन होती. वास्तविक पाहता सुचित्रा ही प्रशांत च्या बायकोची मैत्रीण होती. प्रशांतने सुरुवातीला तिच्याशी फोनवरुन गप्पा मारल्या. तिचा विश्वास संपादन केला. तिच्यासह शरीर संबंधही प्रस्थापित केले. सुरवातीला प्रशांत सुचित्राला ताई म्हणून संबोधित होता. आपण कृत्रीम गर्भधारणेने मूल जन्माला घालू इच्छितो असं सुचित्राने प्रशांत नांबियारला सांगितलं होतं. मात्र यासाठी प्रशांत तयार नव्हता. सुचित्राने मूल जन्माला घातलं तर आपल्या कुटुंबावर त्याचा परिणाम होईल. त्यामुळे त्याने सुचित्राचा काटा काढण्याचा निर्णय घेतला.
प्रशांत नांबियारने त्याची प्रेयसी सुचित्राला ठार करण्यासाठी गुगलवर एक मजकूर शोधला होता. एका अध्यात्मिक गुरुने त्याच्या पत्नीला कसं मारलं? How Did Spiritual Guru Killed his wife? हे सर्च केलं होतं. त्यानंतर त्याने सुचित्राच्या हत्येचा कट रचला. त्यानंतर प्रशांतने मृतदेहाची विल्हेवाट कशी लावतात हे देखील गुगलवर शोधलं होतं. पोलिसांनी पकडू नये म्हणून त्याने फुलप्रूफ प्लान तयार केला. सुचित्राची हत्या करण्याधी प्रशांत नांबियारने काही हत्यांवर आधारीत असणारे चित्रपटही पाहिले होते.
या प्रकरणात गुगल सर्च हिस्ट्रीच्या मदतीने पोलिसांनी आरोपीला अटक केली. सोमवारी प्रशांत नांबियारला कोल्लमच्या अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. नादुविलक्करा गावात राहणाऱ्या सुचित्रा पिल्लईच्या हत्येप्रकरणी कोर्टाने प्रशांत नांबियारला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसंच त्याला अडीच लाखांचा दंडही ठोठावाला आहे. या दोघांची ओळख २०१९ मध्ये झाली होती. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं होतं.
सुचित्रा आणि प्रशांत हे प्रियकर प्रेयसी होते खरे. मात्र सुरुवातीला सुचित्राला ताई म्हणून प्रशांत हाक मारत असे. हळू हळू तो तिच्या प्रेमात पडला. तसंच या दोघांमध्ये शारिरीक संबंधही प्रस्थापित झाले होते. मात्र २०२० मध्ये प्रशांत नांबियारने सुचित्रा पिल्लईची हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करुन तिला संपवलं. तसंच या सगळ्या तुकड्यांची विल्हेवाटही त्याने लावली.
सुचित्रा पिल्लई ही ब्युटीशियन होती. तिची हत्या केल्यानंतर प्रशांत नांबियारने तिच्यासह सोशल मीडियावर केलेले सगळे चॅट्स डिलिट केले होते. तसंच सुचित्राचा मोबाईलही प्रशांतने नष्ट केला. मात्र फॉरेन्सिक टीमने तज्ज्ञांच्या मदतीने सुचित्राचे चॅट्स क्लाऊडवरुन रिकव्हर केले. यामध्ये या पथकाला व्हॉट्स अॅप चॅटही मिळाले. ही बाब या केससाठी अत्यंत महत्त्वाची ठरली. यावरुन पोलिसांना हे समजलं की आरोपी प्रशांत नांबियार हा काही ना काही बहाण्याने पल्लकडला घेऊन जाऊ पाहात होता.
प्रशांतने सुचित्राला पल्लकड या ठिकाणी एका भाड्याच्या घरात आणलं. तिथे त्याने सुचित्राचं डोकं भिंतीवर आपटलं. त्यानंतर तिच्या गळ्याभोवती इमर्जन्सी लाइट केबल आवळली आणि तिची हत्या केली. त्यानंतर प्रशांत नांबियारने सुचित्राच्या मृतदेहाचे तुकडे केले. हे तुकडे त्याने जवळच असलेल्या एका शेतात पुरले. १७ मार्च २०२० ला सुचित्राने तिचं घर सोडलं होतं. २० मार्च २०२० ला तिचा कुटुंबाशी शेवटचा संपर्क झाला होता. तिच्या कुटुंबाने सुचित्रा हरवल्याची तक्रार दिल्यानंतर कोट्टियम पोलिसांनी तिचा शोध सुरु केला होता.