अमरावती विभागातील अनुदानित बोगस अपंग शाळा,कर्मशाळाची मान्यता रद्द करा
अपंग जनता दल सामजिक संघटनेचे विभागीय आयुक्तांना निवेदन
अमरावती: अपंग विद्यार्थ्यांचा जलद गतीने विकास व्हावा म्हणून शासनाकडून विविध योजना व सवलती सुरु केलेल्या आहेत. यामध्ये अपंगांच्या शाळा / कर्मशाळा ह्या सुध्दा समाविष्ट आहे. अपंग कल्याण आयुक्त यांच्या मार्फत अपंग शाळांना मान्यता व अनुदान देवून चालविण्यात येते. परंतु अमरावती विभागातील अपंगांच्या शाळा व कर्मशाळा मध्ये कोणत्याही सोयी सुविधा नसून विद्यार्थी सुध्दा नाही. तरी सुध्दा समाज कल्याण विभागाच्या मार्फत आर्थिक व्यवहार करुन विद्यार्थी उपस्थिती दाखवून लाखो रुपयांचे अनुदान संस्था चालक लाटत आहे व कर्मचारी सुध्दा विद्यार्थी नसून पूर्ण वेतन घेत आहेत. अनेक शाळेमध्ये कर्मचारी उपस्थित सुध्दा राहत नाही. अश्या शासनाची दिशाभूल करणाऱ्या बोगस शाळा व कर्मशाळेची उच्चस्तरीय चौकशी करून मान्यता रद्द करण्यात यावी. अन्यथा अपंग जनता दल सामाजिक संघटनेकडून तिव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदन विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती येथे देण्यात आले यावेळी रजिक शाह. राहुल वानखेडे. रुस्तम शेख. मयूर मेश्राम. कांचन कुकडे. शीतल पटोकर ये उपस्थित होते