डिजीटल काळातील आव्हाणांसाठी तयार राहा… प्रा. चेतन गोडबोले, पूणे
तिवसा जि अमरावती
स्थानिक वाय डी व्ही डी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मा. प्राचार्य डॅा एच आर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पूणे येथील निलया गृप चे प्रा चेतन गोडबोले यांनी ‘सक्सेस मंत्रा-इंटीलेजन्स ॲंड स्कील’ Success Mantra-Intelligence & Skill या विषयावर गेस्ट लेक्चर आयोजीत करण्यात आले होते या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हनुन प्रा चेतन गोडबोले यांनी वरील प्रतिपादन केले.कला, वाणिज्य व विज्ञान या तिनही शाखांच्या अभ्यास मंडळाच्या वतीने या गेस्ट लेक्चर चे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी विचार मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष
प्रभारी प्राचार्य डॅा कुसुमेंद्र सोनटक्के, प्रमुख अतिथी मा सचिन बोर्डे,पूणे, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा राहुल माहुरे, ग्रंथालय विभाग प्रमुख डॅा रविंद्र पाटील उपस्थीत होते.
कार्यक्रमाची सुरुवात महामानवांच्या प्रतिमांना हारार्पन आणि पुजन करुन करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवुन स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि परिचय प्रा राहुल माहुरे यांनी केले केले. प्रास्ताविकेत त्यांनी सांगीतले की, आजचे युग हे ई-युग आहे. विद्यार्थ्यांना भविष्यात येणाऱ्या अडचणींपासुन वाचवण्यासाठी एकमेकांच्या भावना आणि संवाद जोपासणे गरेजेचे आहे. असे सांगुन प्रमुख वक्त्यांचा परियच करुन दिला.
पुढे बोलतांना प्रा चेतन गोडबोले यांनी विद्यार्थ्यांसोबत मुलाखत तंत्र आणि व्यक्तीमत्व विकासावर आधारीत विविध प्रात्यक्षीके सादर केली. दैनंदिन व्यवहारांमध्ये स्वतःला इतरांच्या तुलनेत सरस ठेवण्यासाठी व्यक्तिमत्त्व विकासाची गरज आहे. वाचन करणारा व्यक्ती ज्ञानी समजला जातो. कारण दररोज त्याच्या ज्ञानात भर पडत असते. नवनवीन गोष्टी तो आत्मसात करीत असतो. यामुळे तुमचा समजूतदारपणा अधिक फुलतो. आणखी लोक तुमच्याशी जोडले जातात. म्हनुन वाचन करा असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हनुन अध्यक्षीय भाषनात
डॅा कुसुमेंद्र सोनटक्के यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा आणि कार्याचा अहवाल मांडला. आणि भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन वारंवार व्हावे असे सांगीतले.
कार्यक्रमाचे संचालन कु. कल्याणी सावरकर यांनी तर आभारप्रदर्शन प्रथमेश रोडगे यांनी केले.
याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी तिनही अभ्यास मंडळाच्या विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.