वाचन छंद प्रेमी’साहित्य समूहच्या,’गुरू जीवनाचे सार’ उपक्रमास भरघोस प्रतिसाद..!
बुलडाणा : शिक्षक दिनाचे औचित्य साधून, वाचन छंद प्रेमी’ साहित्य समूहात, दि.५ सप्टेंबर रोजी ‘गरु जीवनाचे सार’ सदर विषयावर उपक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी, ‘गुरू जीवनाचे सार’ विषयावर महाराष्ट्रातील नामांकित साहित्यिकांनी भरघोस प्रतिसाद देउन, विविधांगी काव्यलेखन केले. चिखली-मेहकर येथील प्रसिद्ध साहित्यिक, शाहीर मनोहर पवार सर यांनी सदर लेखनाचे निरपेक्ष परीक्षण केले तर मा. जे. नारायण आमटे सर यांनी ‘गुरू जीवनाचे सार’ उपक्रमाचे उत्कृष्ट सन्मान पत्र बनवून उपक्रमाची शोभा वाढवली.
शिक्षक दिना निमित्त, आयोजित विषयावर,
अकोला येथील जेष्ट कवी, मा. तुळशीराम बोबडे, जेष्ट कवयित्री, नीला ताम्हणकर, सौ. विमल विनायक लांडगे, कवयित्री, अस्मिता अशोक, कवयित्री, ज्योती नारायण कडू, सौ. आरती लाड, कवयित्री, स्वाती कुळकर्णी
कवयित्री, वत्सला दुसेमोराणकर यासह आदी कवी लेखकांनी , ‘गुरू जीवनाचे सार’ विषयावर उत्कृष्ट काव्य लेखन केल्या बद्दल, वाचन छंद प्रेमी’ साहित्य समूहाच्या वतीने सन्मान पत्र देण्यात आले.
दरम्यान, वाचन छंद प्रेमी’ साहित्य समूह संस्थापक अध्यक्ष मा. बबनराव वि.आराख यांनी उपक्रमात सहभागी झालेल्या मान्यवरांचे आभार व्यक्त करून,पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.