क्राइम
रात्री प्रियकराने फोन रिसिव्ह केला नाही सकाळी उठताच मिळाली अशी बातमी

प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न

लातूर / नवप्रहार ब्युरो
अँड्रॉइड मोबाईल आल्यापासून आबालवृद्ध सोशल मीडियावर फार बिझी झाले आहेत. तरुणाई तर सोशल मीडियावर अक्षरशा पागल झाली आहे. दिवसातून अनेक तास तरुणाई मोबाईल पाहण्यात घालवत आहे. सोशल मीडियावर होत असलेल्या चॅटिंग मुळे प्रेम प्रकरण वाढले आहेत. प्रेमात धोका , नाराजी यामुळे आत्महत्येच्या घटनेत प्रचंड वाढ झाली आहे. लातूर मध्ये म्हाडा कॉलनीत प्रेम प्रकरणातून अशीच घटना घडली आहे.
. शुक्रवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास इथं एका १९ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आयुष्याचा शेवट केला आहे. शुक्रवारी रात्री दोनच्या सुमारास ती आपल्या प्रियकराला फोन करत होती. मात्र प्रियकराने फोन उचलला नाही. यानंतर अस्वस्थ झालेल्या तरुणीने स्वत:चं आयुष्य संपवलं. सकाळी गर्लफ्रेंडच्या मृत्यूची बातमी समजताच तरुणाने देखील विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
वैष्णवी विनोद लादे (१९) असे मृत तरुणीचे नाव आहे. तर नरेंद्र रामराव राठोड असे विष घेणाऱ्या तरुणाचे नाव आहे. प्रेमप्रकरणातून ही घटना घडल्याचे पीएसआय मनीष आंधळे यांनी सांगितलं. नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथील रहिवासी निवृत्त शिक्षक रामराव राठोड यांचे म्हाडा कॉलनीत घर आहे. त्या घरात त्यांचा मुलगा नरेंद्र (२५) शिक्षणासाठी एकटाच राहतो. या घरापासून काही अंतरावर बारावीचे शिक्षण झालेली वैष्णवी लादे राहत होती.
मृत वैष्णवी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील एका मॉलमध्ये कामाला होती. मागील काही महिन्यांपासून हे दोघे एकमेकांच्या संपर्कात होते. चार दिवसांपूर्वी नरेंद्र हा पुण्याला जॉब करण्यासाठी गेला होता. दोन दिवसांपूर्वी तो लातूरला परत आला. त्याने वैष्णवीच्या मॉलमध्ये जाऊन तिला भेटण्याचा प्रयत्न केला, परंतु मॉलमधील तरुणांनी नरेंद्रसोबत वाद घालत त्याला मारहाण केली. या घटनेनंतर मध्यरात्री २ वाजता वैष्णवीने नरेंद्रला मेसेज आणि कॉल केले, परंतु नरेंद्रने तो मेसेज सकाळी ६ वाजता पाहिला. यानंतर त्याला थेट वैष्णवीने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. नंतर नरेंद्रने उंदीर मारण्याचे औषध घेतले. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रकृती स्थिर आहे.