राशनकार्ड लाभार्थ्यांनी ईकेवायसी लवकरात लवकर करून घ्यावी – पल्लवी टेमकर
हिमायतनगर – शासनाने राशन कार्डची ईकेवायसी करून घेण्या संदर्भात आदेश काढला असून त्या अनुषंगाने हिमायतनगर तालुक्यात राशन दुकानदारांकडून कार्ड धारकांची ईकेवायसी करणे सुरू आहे. सर्व लाभार्थ्यानी लवकरात लवकर ईकेवायसी करून घ्यावे असे आवाहन तहसीलदार पल्लवी टेमकर मॅडम
यांनी केले.
ईकेवायसी करण्यासाठी सध्या राशन दुकानरांकडे नागरिकांच्या रांगा लागत आहेत. ईकेवायसी करण्याची ठरावीक मुदत असल्याचे काही दुकांनदार सांगत आहेत.
ईकेवायसी करण्यासाठी कार्ड धारकांनी आपल्या राशन दुकारदारांकडे जाणे आवश्यक आहे. ज्यांची नावे राशन कार्ड वर आहेत त्यांनी आपले अधार कार्ड घेवून जावून आपला हताचा थंम्ब द्यावा, एका कार्डसाठी एक ते दोन मिनिटाचा वेळ लागेल त्यामुळे प्रत्येकांनी ईकेवायसी करून घ्यावी अन्यथा आपले राशन कार्ड बंद होऊ शकते किंवा धान्य कमी मिळू शकते असे सांगत त्या म्हणाल्या राशन कार्ड ऑनलाईन झाल्याने देशात कुठे ही राशन दुकानावरून राशन उचलता येते, तालुक्यातील राशन कार्डच्या आरसी बंद झाल्या संदर्भात काही तक्रार असेलतर संबंधीत तहसील कार्यालयात पुरवठा विभागात जावून आपली आरसी पुन्हा सुरू करून घ्यावी असे आव्हान तहसीलदार पल्लवी टेमकर मॅडम यांनी सांगितले आहे.