बलात्कार का बदला बलात्कार

युपी / नवप्रहार मीडिया
तुम्ही खून का बदला खून किंवा मारामारीचा बदला मारामारी असे ऐकले।असेल. पण बलात्कार का बलात्कार हे कधीच ऐकले नसेल. पण काहीही आणि केव्हाही अकल्पनिय घडू शकणाऱ्या यूपीत (उत्तर प्रदेश) मध्ये एक समाजमन सुन्न करणारी घटना घडली आहे. बलात्कार पीडित महिलेच्या काकाने आरोपी तरुणाच्या बहिणीवर बलात्कार केला आहे. पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीनुसार गुन्हा नोंद करून आरोपीला अटक केली आहे.
महिला किंवा मुलीवर बलात्कार झालेला परिवार तसेच मानसिक दृष्ट्या दहशतीच्या छायेत असतो.कारण असा प्रसंग घडलेल्या कुटुंबातील लोकांना पीडित व्यक्ती आणि समाज या दोघांना सांभाळून घ्यावे लागते. अश्याया स्थितीत व्यक्ती हतबल झालेला असतो. पण एका काकाने त्याच्या पुतनीवर झालेल्या बलात्काराचा बलात्कार करून बदला घेतला आहे. ही घटना परिसरात चर्चेचा विषय बनली आहे. ३ मार्च रोजी एका विवाहितेवर गावातीलच एका तरुणाने बलात्कार केला होता. त्यानंतर पोलिसांनी ६ मार्च रोजी आरोपीला अटक केली होती.
चुलत पुतणीवर झालेल्या अत्याचाराने संतप्त झालेल्या चुलत्याने आरोपीचा बदला घेण्यासाठी भयंकर षड्यंत्र रचले. त्याच्या विवाहित बहिणीवर १३ मार्च रोजी घरात घुसून बलात्कार केला. पीडितेने पोलिसांना सांगितले की, आरोपीकडे तिचा फोटो व व्हिडिओ होता. तो व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने घराच्या छतावर बोलावून तिच्यावर अत्याचार केला.
बलात्काराच्या पहिल्या घटनेत पोलिसांनी केवळ छेडछाडीचे कलम लावून गुन्हा नोंद केला होता. पीडितेने न्यायालयात साक्ष देताना सांगितले की, तिच्यावर बलात्कार झाला आहे. त्यानंतर पोलिसांनी बलात्काराचे कलम लावले व आरोपींना अटक केली. आरोपी तुरुंगात जाताच पीडितेच्या काकाने या बलात्काराचा बदला घेण्याचा डाव रचला.
१४ मार्च रोजी त्याला गुन्हा नोंद करून आरोपीला सोमवारी अटक करण्यात आली. बलात्काराचा बदला बलात्कार करून घेतल्याच्या वृत्ताने समानमन सुन्न झाले आहे. परिसरात ही घटना हा चर्चेता विषय ठरली आहे. दोन्ही बलात्कार पीडित महिला विवाहित आहेत. यावरूनही अनेक चर्चा होत आहेत.