क्राइम

नोकरीचे आमिष देत गुंगीचे औषध देऊन महिलेवर वकिलाचा बलात्कार 

Spread the love

वकिला विरोधात बलात्कार, ॲक्ट्रासिटी आणि अवैध सावकारी विरोधात गुन्हा दाखल 

नाशिक  / नवप्रहार डेस्क 

                ब्युटी पार्लर चां व्यवसाय कोरोना काळात बंद पडल्याने मदतीसाठी गेलेल्या महिलेला चहात गुंगीचे औषध टाकून बलात्कार केल्याचा. या प्रसंगाचे चित्रीकरण करून ते पतीला आणि मुलांना दाखविण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केल्याची तक्रार पिडीतेने पोलिसात केली आहे. तसेच 25हजार रुपये देऊन त्यावर महिन्या काठी 1 हजार व्याज घेत होता.पोलिसांनी महिलेच्या तक्रारी वरून वकिला विरोधात विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

पीडितेच्या फिर्यादीनुसार 2019 पासून आतापावेतो बलात्कार केला व अवैध रित्या व्याज घेतले. पीडितेच्या फिर्यादीनुसार, तिची संशयित ऍड कनोजी सोबत 2019 मध्ये ओळख झाली. पीडिता एकदा कामानिमित्त घरी गेली असता चहा मध्ये गुंगीचे औषध टाकून संशयिताने अत्याचार केला. तसेच अत्याचाराचे चित्रीकरण केले. त्यानंतर व्हिडीओ पती आणि मुलांना दाखवेल असे धमकावत संशयीताने वारंवार अत्याचार केला. कोरोना काळात पीडितेचा ब्युटी पार्लरचा व्यवसाय ठप्प झाल्याने संशयित संजय कनोजी याने पीडितेस नोकरीं देत 25 हजार रुपये कर्ज दिले. त्या पोटी पीडित महिलेकडून वकीलाने दरमहा एक हजार रुपये व्याज घेतले. तसेच पीडित महिलेच्या पतीच्या नावाने स्वतःचे बनावट आधार कार्ड बनवून त्याचा गैरवापर केला. संशयित वकील कनोजी हा वारंवार अश्लील व्हिडिओ पती व मुलांना दाखवण्याची धमकी देत अत्याचार करीत. तसेच जातीवाचक बोलून आणि अवैधरित्या व्याज वसूल केल्याप्रकरणी पीडीतेने संशयिता विरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी संशयित वकिलास ताब्यात घेतले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close