पतीचा मित्रांसोबत पत्नीवर बलात्कार

नूडल्स मध्ये गुंगीचे औषध टाकून केला अत्याचार
लखनऊ / नवप्रहार डेस्क
नवरा आणि बायकोचे नाते विश्वासाचे नाते आहे. बायको नवरा असतांना स्वतःला सगळ्याच दृष्टिकोनातून सुरक्षित समजते. पण त्याच नवऱ्याकडून जर विश्वासघात होत असेल आणि तो ही साधासुधा नव्हे तर बलात्कारा सारखा त्यातल्या त्यात नवरा बायकोवर मित्रां सोबत बलात्कार करत असेल तर बायकोच्या मनावर काय परिणाम होईल ? असाच प्रकार युपी च्या महोबा मध्ये घडला आहे. येथे एका नवऱ्याने आपल्या बायकोला नूडल्स मध्ये गुंगीचे औषध देऊन दोन मित्रांसोबत बलात्कार केला आहे. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
पीडितेच्या माहितीनुसार, एक आरोपी गावातील ग्राम प्रधानचा छोटा भाऊ आहे. त्यामुळे पोलीस तक्रार दाखल करुन घेण्यास टाळाटाळ करत होते. त्यानंतर महिलेने पोलीस अधीक्षकांकडे याप्रकरणी तक्रार केली होती. त्यानंतर एफआयर दाखल करुन घेण्यात आला आहे. पतीनेच असे कृत्य केले असल्याने पत्नी धक्क्यामध्ये आहे. शिवाय गावकऱ्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पती आपल्या दोन मित्रांसोबत घरी आला होता. त्याने सोबत चायनिज नुडल्स आणलं होतं. महिलेने घरी स्वयंपाक बनवला होता.पती आणि त्याच्या दोन मित्रांनी जेवण केलं. महिलेने नुडल्स खाल्ले आणि ती घरकामाला लागली. पण, चायनिज नुडल्समध्ये गुंगीचं औषध टाकल्याची तिला कोणतीही कल्पना नव्हती. नुडल्स खाल्ल्यानंतर महिला बेशुद्ध पडली.
आरोप असा आहे की, पती, त्याचा मित्र भगवानदास आणि अन्य एका अज्ञात व्यक्तीने महिलेवर सामूहिक बलात्कार केला आहे. महिलेला जेव्हा शुद्ध आली तेव्हा ती निर्वस्त्र होती. तिला आपल्यावर अत्याचार झाल्याचं समजलं. पतीला तिने याबाबत जाब विचारला, पण पतीने उलट तिलाच धमकी दिली. पतीने महिलेला जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे
महिलेच्या सासरच्यांनी देखील गोष्ट बाहेर जाऊ नये यासाठी धमकवल्याचं कळतंय. पण, महिलेने आपल्यासोबत झालेली आपबीती माहेरच्यांना सांगितली, तेव्हा सर्वांना धक्का बसला. पीडितीने सांगितलं की, आरोपी भगवानदास गावाच्या प्रधानाचा छोटा भाऊ आहे. त्यामुळे कारवाई करण्यास टाळाटाळ करण्यात आलीये.