फर्निचर चा निकृष्ट दर्जा पाहून पालकमंत्री संजय राठोड चा राग अनावर
अनेक त्रुटी आढळून आल्याने आमदार राठोड संतापले, बिल न काढण्याचे मुख्याधिकारी दिले आदेश.
नेर:- नवनाथ दरोई
नेर शहराच्या सौंदर्यिकरण्यासह सांस्कृतिक वैभवमध्ये 18 करोड खर्च करून अद्यावत असे नाट्यगृह पूर्णत्वास येत आहे.या नाट्यगृहाची पाहणी जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री व नेर,दारव्हा, दिग्रस मतदार संघाचे आमदार संजय राठोड यांनी सूक्ष्म पाहणी केले असता, सभागृहामध्ये टाकण्यात आलेल्या खुर्च्या ह्या निकृष्ट दर्जाच्या दिसून आल्यामुळे, त्या सर्व खुर्च्या काढून त्या जागेवर लेजरच्या आरामदायी खुर्च्या बसविण्यात याव्या, तसेच सभागृहात निकृष्ट दर्जाच्या लावलेले प्लाय काढून त्या ठिकाणी ग्रीन प्लाय लावण्यात लावा.ए.सी.हा उच्च कंपनीचा बसविण्यात यावा. तसेच प्रकाश योजना, ध्वनी, गगनिकाची कमतरता दिसून आली नाटकाच्या वेळी वरून कलावंतावर लाईट देण्यासाठी जे बॉटम लावले जातात ते पण त्या ठिकाणी दिसून आले नाही. मंचावरील एलईडी लाईटच्या ठिकाणी पार लाईट किंवा स्पॉट लाईट असायला पाहिजे. अशा अनेक त्रुटी आमदार संजय राठोड यांच्या निदर्शनात नाट्य लेखक बापूराव रंगारी, नाट्य व नृत्य कलावंत डॉ. राहुल हळदे व कलावंत नवनाथ दरोई यांनी आणून दिल्यात.सभागृह व नाटयगृहाच्या उद्घाटन प्रसंगी या नाट्य मंदिरात सई रे सई या नाटकासह, नाट्यमहोत्सव व दर्जेदार नाटके सादर केला जाईल. नाट्य झाल्यानंतर कलावंताने मंच योग्य आहे असे सांगितल्यानंतरच यांचे बिल काढावे,तो पर्यंत माझ्या आदेशापर्यंत बिल काढू नये. असे स्पष्ट शब्दात नेर नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी निलेश जाधव यांना सांगण्यात आले .