सामाजिक

अंजनगाव तालुका मध्ये रानभाजी महोत्सव आयोजन

Spread the love

अंजनगाव सुर्जी, मनोहर मुरकुटे

तालुका कृषी अधिकारी अंजनगाव यांच्या वतीने नुकतेच जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधुन रानभाजी महोत्सव चे आयोजन करण्यात आले होते . यावेळी अध्यक्षस्थानी उपविभागीय कृषी अधिकारी अचलपुर श्री.आर. डी.वाघ साहेब तर प्रमुख पाहुणे श्री.कमलनाथ लाडोळे माजी नगराध्यक्ष होते. तर कार्यक्रमाचे उद्घाटक श्री. प्रमोद कुकडे प्रगतशील शेतकरी व प्रमुख मार्गदर्शक डॉ. नारायण कावरे, मनोहर मुरकुटे, मनोहर भावे, व असंख्य शेजारी बांधव ह्यावेळी कार्यक्रमाला उपस्थित होते यावेळी प्रस्ताविक श्री.आ.बी तराळ तालुका कृषी अधिकारी अंजनगाव यांनी केले, तर सूत्रसंचालन श्री.अजित चित्रकार कृषी सहायक यांनी केले. रानभाज्या महोत्सव मध्ये दुर्मीळ अशा राणभाज्या ,कंदभाज्या, फळभाज्या, वेगवेगळे मिलेट्स विक्रिस उपलब्ध होते. यावेळी अंजनगाव शहरातील शाळेतील विद्यार्थी शिक्षक वर्ग यांनी रानभाजीचे ओळख महत्त्व पटवुन घेतले यावेळी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन धिरज वानखेडे बीटीएम यांनी केले. महोत्सवास मोठ्या प्रमाणात नागरीक , शेतकरी ,शेतकरी मित्र उपस्थित होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close