रामप्रभू तराळे सह हजारो कार्यकर्त्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश .
विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी अकोट तेल्हारा तालुक्यातील राम प्रभू तराळे यांच्यासह असंख्य लोकांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रवेश व कार्यकर्ता मेळावा संपन्न.
रितेश टीलावत
तेल्हारा प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम हा अगदी काही महिन्यावरच आला असताना भाजपा सह इतर पक्षांना धक्का देण्याची तयारी शिवसेनेने यावेळेस तयार केलेली आहे. अकोट विधानसभा हा पूर्वीचा शिवसेनेचा बालेकिल्ला होता परंतु त्यानंतर भाजप शिवसेना युती तो नेहमी भाजपला सुटत गेला मात्र यावेळेस हजारो शिवसैनिकां ची इच्छा आहे की हा मतदार संघ आता फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुटला पाहिजे.या साठी सर्व कार्यकर्ते कसशीने तयारीला लागलेले आहेत याचाच एक भाग म्हणून तेल्हारा अकोट तालुक्याच्या दरम्यान असलेले एदलापूर गावातील राष्ट्रवादीचे मोठे नेते रामप्रभू तराळे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रवेश घेतला या कार्यक्रमाला बाळापूर विधानसभा मधील डॅशिंग आमदार नितीनजी बापू देशमुख हे विशेष करून उपस्थित राहिले होते. त्यांच्या सोबत जिल्हाप्रमुख गोपाल जी दातकर, जिल्हा संघटिका मायाताई म्हैसने, उपजिल्हा प्रमुख दिलीप भाऊ बोचे सुद्धा होते.यावेळेस कार्यक्रमां मध्ये बोलताना रामप्रभू तराळे यांनी आपले मत व्यक्त केले की माझा परिवार हा पूर्वीचा शिवसेनेचाच असून बाळासाहेबांच्या विचारांना प्रामाणिकपणे पुढे नेणारा परिवार आहे. म्हणून माझ्या वडिलांनी नेहमी कोणत्याही निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षालाच पाठबळ दिले आणि मतदान केले.आता त्याच विचारांवर चालण्याची गरज मला निर्माण झालेली आहे म्हणून मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर पक्षप्रवेश करत आहे. मी पूर्ण ताकदीने अकोट आणि तेल्हारा तालुक्यामध्ये गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक निर्माण करण्याचं काम प्रामाणिकपणे करेल.
आमदार नितीन देशमुख यांनी यावेळेस भाजपाने कशा पद्धतीने या महाराष्ट्र लुटले आणि भाजपाला एकच पक्ष हरवू शकतो एकच संघटना हरवू शकते त्याच नाव म्हणजे शिवसेना. या वेळेस कार्यकर्त्यांना आणि शिवसैनिकांना आठवण करून दिली ही लढाई पूर्ण ताकदीनिशी आपल्याला लढायची आहे आणि रामप्रभू तराळे अकोट आणि तेल्हारा मतदार संघात नव संजीवनी देण्याचं काम करतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
जिल्हाप्रमुख गोपाल भाऊ दातकर यांनी सुद्धा आपले मत मांडताना सांगितले की शिवसैनिकांनी आता ताकदीने कामाला लागावे कारण ही लढाई आता आपल्या अस्मितेची आणि अस्तित्वाची निर्माण झालेली आहे.अशा पद्धतीने हजारो लोकांचा मेळावा आणि पक्षप्रवेशाचा हा कार्यक्रम अगदी दिमाखात संपन्न झाला याची जिल्हाभर चर्चा सुरू आहे .यावेळी ज्ञानेश्वर परनाठे शेतकरीसेना जिल्हाप्रमुख, ब्रह्मकुमार पांडे तालुकाप्रमुख अकोट, अजय भाऊ गावंडे तालुकाध्यक्ष तेल्हारा, जगन्नाथजी निचळ , प्रशांत अढाऊ , हरिदिनी वाघोडे, गीता ताई मोरे,अमोलजी पालेकर, श्याम गावंडे, विवेक खारोडे,मनोजभाऊ खंडारे, सचिनजी थाटे, पुरुषोत्तमजी गावंडे, अतुलजी म्ह्येसने, विक्रमजी जायले, पप्पूशेठ सोनटक्के, उषाताई गिरनाळे, वनिताताई वाकोडे, शंकरराव ताथोड, गोपाल विखे, राजेश वानखडे,विक्रांत शिंदे,प्रल्हाद दादा मोहोळ, प्रणव चोरे, गौरव आप्पा धुळे, गजानन भाऊ मोरेखडे, निलेश धनभर, दिलीपजी तराळे, गणेशराव चिकटे,सर्व शिवसैनिक व कार्यकर्ते हजर होते. हजारो शिवसैनिकांच्या साक्षीने पक्षप्रवेश व कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनंजय गावंडे सूत्रसंचालन सलमान खान यांनी केली.