आयकर म्हणजे सुसंस्कृत व सुख सुविधेसह जगण्याकरिता दिलेले योगदान-संदीपकुमार साळुंके
जिल्हा बँकेतर्पेâ आयकर विषयावर परिसंवादाचे आयोजन
भंडारा – ‘ई-व्हेरीफिकेशन स्कीम २०२१ आणि स्टेटमेंट ऑफ फायनांशियल ट्रान्झेक्शन’ चे अनुपालन या विषयावर आयकर विभाग नागपुर व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विद्यमाने १० मे रोजी देवेंद्र लॉनमध्ये परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादाला प्रमुख मार्गदर्शक म्हणुन संदीपकुमार साळुंखे, डायरेक्टर ऑफ इन्कम टॅक्स तसेच श्रीमती कौमुदी पाटील, अॅडिशनल डायरेक्टर ऑफ इन्कम टॅक्स प्रामुख्याने उपस्थित होते.
परिसंवादाला संबोधीत करतांना साळुंखे म्हणाले कि, समाजात आयकराविषयी जो गैरसमज आहे तो पुर्णत: चुकिचा आहे. उत्पन्नावरिल करामुळे देशाचा विकास होतो आहे. त्यामुळे देशहिताकरिता आयकर भरणे आवश्यक आहे. आयकर भरणार्या लोकांकरिता सुसंस्कुत आणि सुख सुविधेसह जगण्याकरिता दिलेले एक योगदान असल्याचे सांगुण अगदी सरळसोप्या भाषेत आयकराची व्याख्या समजावुन सांगीतली. सर्व पगारी कर्मचारी, व्यावसायीक, उद्योगपती व अन्य अर्थाजन करणारी व्यक्ति यांनी दरवर्षी आयकर रिर्टन फाईल केल्यास आयकर विभागाचे काम सुलभ होईल व सर्व बँकांनी स्टेटमेंट ऑफ फायनांशियल ट्रान्झेक्शन चे अनुपालन योगक्रिया समजुन करावे, जेणेकरुन आयकर विभागाद्वारे होणारी कारवाई टाळता येईल. असेही आवाहन साळुंखे यांनी यावेळी केले. बँका, एस.आर.ओ., जे.डी.आर. सनदी लेखापाल, वकिल याचे आयकराविषयी कार्य बहुमुल्य योगदान आहे. नागरिकांनी ६० नंबर फार्म, ६१ नंबर फार्म, पॅनकार्ड, रिर्टन फाईल यांचे महत्व समजुन घेण्याचे आवाहन डॉ. कौमुदी पाटील यांनी केले. विकासकुमार सिंग यांनी स्लाईड शो द्वारे उपस्थितांना एस.एफ.टी. च्या अनुपालनाबाबत उपथितांना माहिती दिली.
या परिसंवाद कार्यक्रमाला जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सदाशिव वनथरे, अर्बन बँकेचे अध्यक्ष नाना पंचबुद्धे, सनदी लेखापाल रोहीत बजाज, के.एस. कांबळे, जे.आर.डी.भंडारा,अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मदान, श्रीमती बॅनर्जी, देवेंद्रकुमार,सुरेश, पोहणे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय बरडे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन लेखाधिकारी बोरकर यांनी केले.