क्राइम

राजूर घाटात महिलेवर पाशवी समूहिक बलात्कार ; पाचवी किंवा सहावी घटना

Spread the love

नातेवाईकांसोबत फिरायला आली होती महिला

पोलिसांना कळवून देखील पोलीस पोहचले नाही ; आ. संजय गायकवाड आक्रमक 

बुलढाणा /” नवप्रहार मीडिया नेटवर्क

           जीह्यातील राजूर घाटात य3क खळबळजनक घटना घडली आहे. नातेवाईकांसोबत फिरायला आलेल्या महिलेवर सहा ते सात लोकांनी पाशवी अत्याचार केला आहे. मागील काही दिवसातील ही पाचवी ते सहावी घटना असल्याचे बोलल्या जात आहे. पोलिसांना माहिती देऊन देखील पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्याने आ.संजय गायकवाड चांगलेच आक्रमक झाले व त्यांनी पोलीस विभागाला धारेवर धरले.

या घटनेची माहिती मिळताच आमदार संजय गायकवाड यांनी बोराखेडी पोलीस स्टेशन गाठून पोलिसांना चांगलंच धारेवर धरलं आहे. महिलेवर बलात्कार होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतरही तब्बल चार तास पोलीस घटनास्थळी पोहोचले नाही.  यात कारणामुळे आमदार संजय गायकवाड अत्यंत आक्रमक झाले आहेत.

गेल्या दीड महिन्यात या राजूर घाटात तब्बल सहा ते सात सामूहिक बलात्कार झाले असल्याचंही गायकवाड म्हणाले आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील राजूर घाटात फिरण्यासाठी येणाऱ्या महिलांवर, मुलींवर बाहेरून आलेली टोळकी चाकूचा धाक दाखवून मारहाण करून बलात्कार करत असल्याचा आरोप संजय गायकवाड यांनी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजूर घाटात महिलेवर 6 ते 7 जणांचा सामूहिक बलात्कार केला. मात्र पोलिसांना माहिती मिळूनही पोलीस घटनास्थळी वेळेत पोहोचले नाहीत ..अशात आता जोपर्यंत या गुन्हेगारांवर बलात्काराच्या स्वरूपाचा गंभीर गुन्हा दाखल होत नाही आणि त्यांना अटक होत नाही तोपर्यंत पोलीस स्टेशनमधून हलणार नाही, अशी भूमिका आमदार संजय गायकवाड यांनी घेतली आहे. या घटनेमुळे बुलडाणा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. आता पोलीस या प्रकरणी काय कारवाई करणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.आरोपींना लवकरात लवकर पकडून कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी होत आहे .

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close